Raj Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray: PM मोदींपासून ते महायुतीच्या आमदारांपर्यंत, राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडीओ'द्वारे केली पोलखोल

Raj Thackeray On Bogus Voter Lists: गोरेगावच्या नेस्को मैदानावर मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार यादीवरून थेट मोदी सरकारला धारेवर धरलं. तसंच मतदार यादी स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊन देणार नाही, असा इशारा दिला.

Priya More

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोगस मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारपासून ते राज्यातील महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी राज ठाकरे यांनी 'लाव रे तो व्हिडीओ' असे म्हणत पीएम मोदींपासून ते महायुतीच्या आमदारांच्या भाषणाचे जुने व्हिडीओ जाहीर सभेमध्ये दाखवत सर्वांची पोलखोल केली. गोरेगावच्या नेस्को मैदानावर मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी 'जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊन देणार नाही.', असा इशारा दिला.

राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील गोंधळाचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की, 'कित्येक वर्षे मतदार यादीमध्ये गोंधळ सुरू आहे. महाराष्ट्रातील मतदार यादीमध्ये ९६ लाख खोटे मतदार भरले आहेत. या निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग आहेत. मत द्या किंवा देऊ नका मॅच फिक्सिंग झालंय. निवडून आलेले आमदारही आवाक झाले होते. ही कोणती लोकशाही आहे. आयोगाला प्रश्न विचारल्यानंतर सत्ताधाऱ्यांना राग येतो. गल्लीबोळातल्यांना माहिती आहे की सत्ता कशी आली. सत्ताधाऱ्यांना राग येतो कारण त्यांनी शेण खाल्लं.'

राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान पुन्हा 'लावरे तो व्हिडीओ' असे म्हणत पीएम मोदींपासून ते महाराष्ट्रातील आमदारांचे जुने व्हिडीओ भरसभेत दाखवले. पीएम मोदींचा व्हिडीओ दाखवत ते म्हणाले की, 'मी काय वेगळं बोलत आहे. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हाचे त्यांचे हे भाषण आहे. आता ते स्वत: पंतप्रधान आहेत. आम्ही काय वेगळे बोलत आहोत. या निवडणूक आयोगाला तेच सांगतोय तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहोत.नरेंद्र मोदी त्यावेळी बोलत होतो तुम्ही सत्ताधाऱ्याचे गुलाम नाही आणि आज मी तेच बोलत आहे.'

'त्यांची हिंमत कुठपर्यंत गेली आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार सांगतो की मी निवडणुकीला २० हजार मतदार बाहेरून आणले. पैठणचे आमदार जाहीर भाषणात सांगत होते तेव्हा शिंदेंनी डोळा मारला.' राज ठाकरे यांनी या आमदार विलास भुमेर यांचा तो व्हिडीओ दाखवत शिंदेसेनेवर टीका केली. 'महाराष्ट्रातील मतदारांचा आपमान ते जाहीर मंचावरून करत आहेत. हे २० हजार मतदार बाहेर आणले त्यातूनच त्यांची सत्ता आली.', असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. राज ठाकरे यांनी यावेळी अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण, एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड, भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे याचे जुने व्हिडीओ दाखवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Aadesh Bandekar Son Wedding: महाराष्ट्राचे 'लाडके भावोजी' आदेश बांदेकरांची सून कोण आहे?

Shocking : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा भीषण अपघातात मृत्यू; शरीराचे झाले दोन तुकडे

Kul Kayda: मालक झालेल्या कुळांच्या शेतजमिनीची विक्री करता येते का? काय आहे कुळ कायदा?

Maharashtra Live News Update: प्राजक्ता गायकवाड लग्नबंधणात अडकणार, लग्नपूर्वीच्या विधींना सुरूवात

SCROLL FOR NEXT