Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Raj and Uddhav Thackeray Alliance In Thane Civic Elections: आता राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येतेय.. अखेर ठाकरे बंधू निवडणूक एकत्र लढणार आहेत. खासदार संजय राऊतांनी काय घोषणा केली आहे?
Sanjay Raut announces Thackeray brothers’ alliance in Thane; Raj and Uddhav Thackeray to challenge Eknath Shinde’s bastion.
Sanjay Raut announces Thackeray brothers’ alliance in Thane; Raj and Uddhav Thackeray to challenge Eknath Shinde’s bastion.Saam Tv
Published On

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे दोन पक्ष ठाण्यात एकत्र येणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊतांनी केली आहे. 'अब की बार 75 पार' अशी घोषणा करतानाच ठाकरे विरोधकांच्या ठिकऱ्या उडवतील, अशा विश्वासही राऊतांनी व्यक्त केलाय. मात्र राऊतांच्या घोषणेची खिल्ली उडवत एमएमआर रिजनमध्ये महायुतीचाच महापौर होणार, असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय.

दुसरीकडे भाजपनंही राऊतांवर निशाणा साधलाय. राऊत जे बोलतात त्याच्या उलट घडतं', असा टोला ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकरांनी लगावलाय. वरळीतील मराठी विजय मेळावा ते दादरमधील दीपोत्सवात एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंकडून अजून अधिकृतपणे युतीची घोषणा झालेली नाही. राज आणि उद्धव यांनी तीन महिन्यात सात वेळा गाठीभेटी घेतल्यात.

ठाण्यातील नागरी प्रश्नांवरुन ठाकरे सेना आणि मनसेने एकत्र येऊन आंदोलनही केले आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने रस्त्यावर एकत्र येत आहेत. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत आता हे डबल इंजिन मुंबई महापालिकेपाठोपाठ ठाण्याचा गडही सर करत शिंदेसेनेला शह देणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com