महिला अधिकाऱ्याची बोटं छाटणाऱ्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले यांची सर्व बोटं... Saam Tv News
मुंबई/पुणे

महिला अधिकाऱ्याची बोटं छाटणाऱ्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले यांची सर्व बोटं...

ठाण्यातील महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात महिला अधिकाऱ्याला हाताची दोन बोटे गमवावी लागली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: ठाण्यातील महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात महिला अधिकाऱ्याला हाताची दोन बोटे गमवावी लागली होती. तसेच या महिला अधिकाऱ्याला वाचवत असताना त्यांच्या अंगरक्षकाचाही एक बोट कापला गेला. हा फेरीवाला परप्रांतीय आहे. या प्रकारावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रचंड संतापले आहेत. ''यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील'' अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे. (Raj Thackeray was angry at the peddlers who cut off the fingers of a woman officer)

हे देखील पहा -

काय म्हणाले राज ठाकरे?

“पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा यांना कळेल, यांची हिंमत कशी होते? तुम्ही बोटं छाटता? आज पकडलेत, उद्या बेल होईल, पुन्हा हे बोटं छाटायला बाहेर. सरकार कशासाठी आहे? सरकारने यावर बंधनं आणली पाहिजेत. हे काय फक्त मुंबईत होत नाही. इतक्या वर्षात कुणाची हिंमत झाली नाही बोटं छाटायची. हे सहीसलामत बेलवर सुटणार. यांना भीती काय आहे हे पोलिसातून बाहेर आल्यावर कळेल.” असा संतप्त इशारा राज ठाकरेंनी दिला.

नक्की काय आहे प्रकरण?

ठाणे महापालिकेच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यासह त्यांचे पथक घोडबंदर भागातील कासारवडवली या ठिकाणी मुख्य मार्केटमध्ये पदपथ आणि रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. कारवाई करण्यासाठी पथक पुढे सरसावत असतांनाच संतप्त झालेल्या फेरीवाल्याने, रागाच्या भरात पिंपळे यांच्यावर चाकू हल्ला केला आहे. हा हल्ला त्यांच्या हातावर झाला आणि त्यामध्ये त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे कापली गेली ती तुटुन खाली पडली. तर या हल्याचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावलेल्या त्यांच्या अंगरक्षकाच्याही डाव्या हाताचे एक बोट कापले आहे. अखेर अमरजीत यादव या परप्रांतीय फेरीवाल्याला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अटक केली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या चाऱ्याची इतर जिल्ह्यांत वाहतूक करण्यास प्रतिबंध

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

Relationship Tips: सासूबाईंची आवडती सून होण्यासाठी करा 'या' ५ गोष्टी; सासरवाडीत व्हाल सर्वांच्या लाडक्या

Tuesday Horoscope: संपत्तीत वाढ होणार! ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

SCROLL FOR NEXT