Raj Thackeray meeting CM Devendra Fadnavis to discuss traffic, parking and flood issues in Mumbai, Pune, and Nashik. Saam TV marathi news
मुंबई/पुणे

देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली, राज ठाकरेंनी A टू Z सगळं सांगितलं

Raj Thackeray meeting CM Devendra Fadnavis : मुंबई, पुणे आणि नाशिकसह मोठ्या शहरातील वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या आणि मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी त्यांनी भेट घेतली.

Namdeo Kumbhar

  • राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

  • वाहतूक, पार्किंग, पावसामुळे झालेल्या समस्यांवर चर्चा झाली.

  • लोकांमध्ये शिस्त नसल्याने कोंडी वाढल्याचं राज ठाकरेंचं मत.

  • सरकारने तातडीने ठोस पावलं उचलण्याची मागणी.

महत्त्वाच्या विषयांवर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. टाऊन पार्किंग संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. मुंबई, पुण्यासह नाशिक आणि महत्त्वाच्या शहरात पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. त्याबाबतचा एक आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. त्यावेळी वाहतूक पोलीस आयुक्तही होते. मुंबईमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे हाहाकार उडाला, त्याला कोणकोणत्या गोष्टी जबाबदार आहेत, त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो, असे राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले. कबुतर, हत्तीण यामध्ये आपण अडकलो आहेत. पण टाऊन प्लॅनिंगसंदर्भात कुणी काही बोलतच नाही. मुख्यमंत्र्यांना पार्किंगसंदर्भात आराखडा दिला, असेही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले ? वाचा सविस्तर

तुमच्याकडील वाहतूक दाखवा, मी तुम्हाला देशाचे भविष्य सांगतो. मुंबई, पुणे, नाशिकसह महत्त्वाच्या शहरात पुनर्विकास होतोय. त्यात अनेक अनाधिकृत कामे होता.. पार्किंगची समस्या गंभीर आहे. पार्किंगला कुठली शिस्तच उरली नाही. आज ज्या ठिकाणी ५० माणसं राहायची, तिथे ५०० माणसं राहत आहेत. त्यामुळे वाहने वाढली, त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होतोय. फक्त ४०० मिलीचा पाऊस पडल्याने हाहाकार उडाला. २००५ पेक्षाही कमी पाऊस पडला, तरीही अशी अवस्था झाली, हे गंभीर आहे. त्यामुळे रस्ते, वाहतूककोंडी, पार्किंगची सोय, या समस्या गंभीर आहेत. लोकांना शिस्त लावायची गरज आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांना आपल्या शहरात पार्किंग कसं करायचं माहिती नाही. कुठेही वाहने पार्क करताता. त्यासंदर्भात मी देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत बैठक झाली. लोकांमध्ये बेशिस्तपणा खूप वाढला आहे. सिग्नल लागला तरी लोक थांबत नाही,. आताच यावर काम केले नाही, तर भविष्यात अतिप्रमाणात आपल्याला त्रास होईल. हाताबाहेर गोष्टी गेलं, तर कोणीच काही करू शकत नाही. सरकारने आता योग्य ते पाऊल उचलणं गरजेचं आहे. सरकारने याबाबत लवकर निर्णय घेऊन लोकांना शिस्त लावावी, असे राज ठाकरे म्हणाले.

मुंबईमध्ये बेशिस्तपणा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरात वाहतूक कोंडीची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कायद्याला न जुमानण्याचे प्रकार वाढले आहे. हाताबाहेर गेले तर कुणीच काही करू शकणार नाही. बाहेरून लोंढे मुंबईमध्ये येत आहेत, लोकसंख्या वाढत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवायला हवं. इमारती वाढत आहेत, माणसांची संख्या वाढत आहेत, पण रस्ते वाढतच नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात बोट बुडाली, अनेकजण अडकल्याची भीती, थरारक VIDEO समोर

Maharashtra Live News Update : रायगड समुद्रात बोट बुडाली

'नोरा फतेहीसारखी फिगर बनव' ३ तास जिम अन् उपाशी ठेवलं; पतीकडून पत्नीचा अतोनात छळ

Neena Gupta: 'त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना हेवा वाटतो...' शॉर्ट्स घातल्याबद्दल ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला नीना गुप्तांचं बेधडक उत्तर

Budhaditya Rajyog: 17 सप्टेंबरपासून या राशींचं नशीब पालटणार; सूर्य आणि बुधाची युती करणार मालामाल

SCROLL FOR NEXT