Video: राज ठाकरे भाषण करायला घाबरायचे..! ऐका पहिल्या भाषणाचा किस्सा Saam Tv
मुंबई/पुणे

Video: राज ठाकरे भाषण करायला घाबरायचे..! ऐका पहिल्या भाषणाचा किस्सा

राज ठाकरे बोलताना म्हणाले की मी एवढा चांगला बोलेन असं कधी वाटलं देखील नव्हतं.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुण्यातील मनसेच्या वतिने आयोजीत केलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात त्यांच्या आयुष्यातील पहिल्या भाषणाचा किस्सा सांगतिला आहे. मला भाषण करायला भिती वाटत असल्याचही राज ठाकरेंनी सांगितले. राज ठाकरे बोलताना म्हणाले की मी एवढा चांगला बोलेन असं कधी वाटलं देखील नव्हतं.

किस्सा सांगताना राज म्हणाले शिवाजी पार्कवर एका कार्यक्रमा दरम्यान मी आणि बाळासाहेब ठाकरे एकाच व्यासपीठावर होते. बाळासाहेबांनी राज ठाकरेंना विचारलं तू बोलणार आहेस का?. तेव्हा राज ठाकरें बाळासाहेबांना म्हणाले तुम्ही काहीतरी बोलू नका नाहीतर मी व्यासपीठावरून निघून जाईल. तेव्हा बाळासाहेबांनी भाषणासाठी आग्रह धरला आणि म्हणाले ''तू बोलतोय का मी जाऊन जाहिर करु''.

तेव्हा राज ठाकरेंनी पहिल्यांदा शिवतिर्थावर एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर भाषण केले. आणि आता जर राज ठाकरेंची भाषण शैली पाहिली आणि ऐकली तर प्रत्येत जन त्यांच्या भाषणाच्या प्रेमात आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना त्यांनी राज्य सरकारला टोमणा मारला आहे. ''ते म्हणाले कोविड बाबत मूर्खपणा सुरु आहे. सरकारनी हवं ते करायचं आणि बाकीच्यांनी नाही करायचं''.

दरम्यान, राज ठाकरे पुण्यात शिवशाहीर करंडक वक्तृत्व स्पर्धेच्या महाअंतीम फेरीसाठी उपस्थित होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या १०० व्या वाढदिवसाच्या निमीत्ताने पुण्यात मनसेच्या वतीने स्पर्धा आयोजीत केली होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: कामाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा हप्ता; कारण काय?

Maharashtra Live News Update: शरद पवार भाकरी फिरवणार? आबांच्या मुलाला मिळणार मोठी जबाबदारी

Maharashtra Election : एकनाथ शिंदेंना जबर धक्का, भाजप-राष्ट्रवादीची 'या' ठिकाणी झाली युती

मोठी बातमी! यशवंत बँकेत तब्बल ११२ कोटींचा घोटाळा, भाजप नेत्यावर गुन्हा, साताऱ्यात खळबळ

Crime News : दुप्पट परताव्याच्या आमिषाला भुलली तरुणाई, सायबर चोरट्यांनी घातला कोट्यावधींचा गंडा; काय आहे नेमकं प्रकरण ?

SCROLL FOR NEXT