प्रवीण दरेकर उद्धव ठाकरे
प्रवीण दरेकर उद्धव ठाकरे SaamTV
मुंबई/पुणे

राज ठाकरेंनी हिंदुत्वाबाबत कधीही तडजोड केली नाही; शिवसेनेने मात्र... (पाहा व्हिडीओ)

सुरज सावंत

मुंबई : हिंदुत्वाच्या बाबतीत जे जे पुढे येतील त्यांचे स्वागत असून राज ठाकरे (Raj Thackeray) हिंदुत्वासाठी अयोध्याला (Ayodhya) जाणार असतील तर ते चांगलचं आहे. शिवसेनेनं वेळोवेळी वेगळी भूमिका घेतली, मात्र राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या भूमिकेबाबत कधीही तडजोड केली नसल्याच वक्तव्यं देखील दरेकरांनी केलं. संजय राऊत यांनी सामनाच्या संपादकीय मधून आणि पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटलांपासून (Chandrakant Patil) ते मोदींपर्यंत केलेल्या सर्व टीकांचे उत्तर आज भाजपा नेते, विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलं आहे. (Raj Thackeray never compromised on Hindutva)

पहा व्हिडीओ -

दरेकर म्हणाले 'राज ठाकरे यांनी कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचाराची भूमिका घेतली नाही. शिवसेना Shivsena आणि भाजपला BJP सरकार बनवण्याचा जनाधार जनतेने दिला होता मात्र तुम्ही अनैसर्गिक प्रकारे सत्ता बनवली याला तुम्ही लोकशाही म्हणता का? संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लोकशाहीची व्याख्या समजून घ्यायला हवी असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला आहे. 2 वर्षात विकास कामे काय केली यावरती कोणी बोलत नाही शिवसेनेच्या अनेक कडवट शिवसैनिकांना (Shivsainik) तिकट न देता त्याच्यावर अन्याय केला त्यांना भाजपने तिकिट दिलं दोन वर्षातील सरकारचा कारभार पाहिला तर डोळे फिरण्यासारखा असल्याचही ते म्हणाले.

नागरिकांचे दुर्लक्ष करण्याचा हा प्रयत्न -

कड्या कुलुप लाऊन शपत घेतल्याचं बोललं जातं, पण ज्या़च्याबर घेतली आज त्यांच्याच मांडीलामाडी लावून सत्तेत आहेत. याचा राऊतांना विसर पडला आहे. मोदी़जींनी उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) मंचावर असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील असे अनेकदा भाषणांतून सांगितलं तेव्हा का आक्षेप घेतला नाही? केंद्र आणि राज्याच्या कुरघोडीवर लक्ष विचलीत करून नागरिकांचे दुर्लक्ष करण्याचा हा प्रयत्न सरकारचा आहे. मूळ प्रश्नापासून बगल देण्याचे काम सरकार करत आहे शंभर कोटी वसूली बांधावर जाऊन शेतकर्यांना पैसे देणारहोते काय झालं महाराष्ट्रात अनेक प्रश्न हाताबाहेर गेले आहेत. शेतकरी संतप्त आहेत महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नांवर उद्धवजींनी लक्ष घालायला हवे.

राऊत सध्या राष्ट्रीय राजकारणावर फार बोलतात २०२४ मध्ये ते गृहमंत्री झाले की देशाची सुरक्षेबद्दल बोलावं केंद्राच्या बाबतीत मोदी सक्षम आहे हल्ली राऊत राष्ट्रीय राजकारणावर बोलतात राऊत साहेब केंद्रीय गृहमंत्री झाले की देश सुरक्षित होईल असा टोला त्यांनी राऊतांना लगावला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal News: १०० चे १००० कोटी कसे झाले? अरविंद केजरीवाल यांच्या कारवाईवरुन सुप्रीम कोर्टाचा ईडीला सवाल; सुनावणीत काय घडलं?

Live Breaking News : अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Rajendra Gavit News | शिंदे गटाच्या खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश,फडणवीसांची उपस्थिती

Suryakumar Yadav Record: एकच वादा, सूर्या दादा..! शतकी खेळी करत मोडले हे मोठे रेकॉर्ड

Supriya Sule News : दत्ता भरणेंच्या अडचणीत भर; सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT