Vasant More Meet Raj Thckeray Saam Tv
मुंबई/पुणे

राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले...

मनसे नेते वसंत मोरे आणि निलेश माझिरे यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: पुणे मनसेमध्ये (MNS) गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या नाराजीनाट्याला आज पूर्णविराम मिळाला आहे. मनसे नेते वसंत मोरे यांच्यासह दोन दिवसापूर्वी मनसेला राजीनामा दिलेले निलेश माझिरे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर वसंत मोरे यांची आणि निलेश माझिरे यांची नाराजी दूर झाली का या चर्चा सुरू झाल्या. यावर आता वसंत मोरे (Vasant More) यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

निलेश माझिरे यांनी फेसबुकवरुन मनसेला राजीनामा देत असल्याची माहिती दिली होती. यानंतर पुणे मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. या चर्चांनंतर आज वसंत मोरे (Vasant More) यांनी निलेश माझिरे (Nilesh Mazire) यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून निलेश माझिरे यांनी मनसेला राम-राम ठोकल्याची चर्चा सुरू होती.

दरम्यान, वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भेटीवर प्रतिक्राया दिली आहे. वसंत मोरे म्हणाले, मी माझी सगळी नाराजी राज ठाकरे यांना सांगितली. माझ्या नाराजीची दखल राज ठाकरे यांनी घेतली. मला आणि निलेश माझिरे यांना स्वत: राज ठाकरे यांनी भेटायला बोलावले होते. माझिरे आणि माझ्यावर अन्याय झाल्याचे मी सांगितले, यावर राज ठाकरे यांनी निलेश माझिरे यांची मनसे माथाडी कामगार सेना पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे.

राज ठाकरे पुण्यात बैठकांना जाणार आहेत. त्याअगोदर शहर कार्यकारणीची बैठक घेणार आहेत. शहर कार्यालयात बैठक झाली तर जायचं नाही ही माझी भूमिका आहे. प्रत्येक पक्षात गटबाजी असते, असंही वसंत मोरे म्हणाले.

या भेटीनंतर वसंत मोरे यांनी ट्विट करुनही माहिती दिली. हीच माझ्या कामाची पावती!, मा. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते निलेश माझीरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली, असं ट्विट वसंत मोरे यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

Maharashtra News Live Update : वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाचा जलसाठा पोहोचला 35 टक्क्यांवर

Highway tyre puncture: हायवेवर टायर पंक्चर झाल्यास काय कराल?

Oral Health Tips: रोज फक्त 2 मिनिटांचा हा उपाय ठरू शकतो दातांसाठी फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितल्या तोंडाच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या सवयी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ८ दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT