वसंत मोरेंसह निलेश माझिरे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; नाराजी दूर होणार का?

आज मनसेच्या या दोन्ही नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
MNS Vasant More News, Nilesh Manzire News
MNS Vasant More News, Nilesh Manzire NewsSaam TV
Published On

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : पुणे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी निलेश माझिरे (Nilesh Mazire) यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवास्थानी मनसेच्या या दोनही नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून निलेश माझिरे यांनी मनसेला राम-राम ठोकल्याची चर्चा रंगली होती. तर दुसरीकडे भोग्यांच्या मुद्द्यावरून वसंत मोरे सुद्धा राज ठाकरेंवर नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान, आज मनसेच्या या दोन्ही नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. (MNS Vasant More Latest Marathi News)

MNS Vasant More News, Nilesh Manzire News
मोठी बातमी! पंकजा मुंडे समर्थकांची भाजप कार्यालयावर दगडफेक

या भेटीदरम्यान, मनसे सोडलेल्या निलेश माझिरे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समजूत काढली असल्याची माहिती आहे. तसेच त्यांना माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले आहे. माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यपद मिळावे अशी माझिरे यांची इच्छा होती. मात्र, जिल्हाध्यक्षपदाला स्थानिक नेते विरोध करत असल्याने निलेश माझिरे यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला होता. अखेर वसंत मोरे यांनी शिवतीर्थावर निलेश माझिरे यांची राज ठाकरे यांच्यासोबत भेट घडवून आणत ही नाराजी दूर केली असल्याची माहिती आहे.

MNS Vasant More News, Nilesh Manzire News
मुंडे, महाजन कुटुंबानं भाजपसाठी आयुष्य खर्ची घातलं, पंकजांना तिकीट न देणे दुर्दैवी - खडसे

दरम्यान, पुण्यात मागील काही दिवसांपासून अंतर्गत वाद असून तो सातत्याने चव्हाट्यावर येत आहे. राज ठाकरे यांनी भोग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरेंनी नाराजी व्यक्त केली होती. ही नाराजी जाहीरपणे उघड केल्यानंतर पुण्यात वसंत मोरेंना पक्षात एकाकी पाडण्यात आले, असा आरोप त्यांनी केला होता.

त्यानंतर वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक निलेश माझिरे यांनाही त्रास देण्यात आला. याच कारणातून माझिरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. दरम्यान, सध्या राज ठाकरेंनी माझिरेंची समजूत काढली असली तरी हा वाद इतक्यात मिटेल, असे दिसत नाही. राज ठाकरे याप्रकरणी काय भूमिका घेतात, ते पाहावे लागणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com