मोठी बातमी! पंकजा मुंडे समर्थकांची भाजप कार्यालयावर दगडफेक

औरंगाबादेत पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप कार्यालयाची तोडफोड केली.
Pankaja Munde Latest Marathi News, Aurangabad News
Pankaja Munde Latest Marathi News, Aurangabad NewsSaam TV
Published On

औरंगाबाद : विधानपरिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे समर्थक आक्रमक झाले आहे. औरंगाबादेत पंकजा मुंडे समर्थक भाजप (bjp) कार्यालयावर चालून आले. यावेळी पंकजा नाही तर भाजपही नाही, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. इतकंच नाही तर, कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात घोषणाही दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यालयावर दगडफेकही करण्यात आली. या दगफेकीत कार्यालयाचे नुकसान झाले आहे. दरम्यान या कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. (BJP Pankaja Munde Latest Marathi News)

Pankaja Munde Latest Marathi News, Aurangabad News
सदाभाऊंना उमेदवारी का दिली? चंद्रकांत पाटलांनी दिलं थेट उत्तर

भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी (maharashtra legislative council election) पाच अधिकृत आणि अपक्ष एक अशा सहा उमेदवारांची घोषणा केली. भाजपकडून विधानपरिषदेत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी दिली जाणार अशी जोरदार चर्चा होती. पण भाजपने जाहीर केलेल्या यादीत पंकजा मुंडे यांच्या नावांचा समावेश नव्हता. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थक नाराज झाले होते. आज कार्यकर्त्यांनी परभणीसह भाजपच्या औरंगाबादमधील कार्यालयावर राडा घातला.

दरम्यान, भाजपकडून विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर, माजी मंत्री राम शिंदे, भाजप महाराष्ट्राचे संघटन सचिव श्रीकांत भारतीय, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे, राज्य भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड आणि अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कालपासून पंकजा मुंडे नॅाट रिचेबल आहेत. कालपासून आपण त्यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. दोन दिवस पंकजा मुंडे बोलणार नाहीत अशी माहिती पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Pankaja Munde Latest Marathi News, Aurangabad News
BIG Breaking : राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी तिसरा उमेदवार जाहीर

पंकजांना तिकीट न देणे दुर्दैवी - खडसे

दुसरीकडे एकनाथ खडसे यांनीही पंकजा यांना उमेदवारी न देण्यावरून प्रतिक्रिया दिली आहे. मुंडे आणि महाजन या दोन्ही कुटुंबांनी आपले आयुष्य भाजपसाठी खर्ची घातले. परंतु, तरीही त्यांना डावलण्यात आले आहे. आज कोणीही नवखे आली की, त्यांना पक्षाकडून उमेदवारी दिली जात आहे. पंकजा मुंडे यांना तिकीट न देणे खरोखरच दुर्दैवी आहे, असे खडसे म्हणाले.

मुंडे आणि महाजन यांनी या सर्वांना आणि पक्षाला मोठे केले. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना अशी वागणूक दिली जात आहे. विरोधी पक्षनेते खूप अनुभवी आहेत. कदाचित म्हणून त्यांनी निर्णय घेतला असेल, असा टोलाही खडसेंनी लगावला. यापूर्वीच्या काळात समन्वयाने आणि सामोपचारानं उमेदवारी देऊन हे प्रश्न निकाली लावले जायचे. मात्र आता जाणूनबुजून घोडेबाजाराला प्राधान्य देऊन जे राजकारण केले जात आहे. ते अतिशय दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रियाही खडसे यांनी यावेळी दिली.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com