सदाभाऊंना उमेदवारी का दिली? चंद्रकांत पाटलांनी दिलं थेट उत्तर

भाजपने सदाभाऊ खोत यांना सहावा उमेदवार म्हणून जाहीर केलं
Sadabhau Khot Chandrakant patil
Sadabhau Khot Chandrakant patilSaam TV
Published On

मुंबई : राज्यात एकीकडे राज्यसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलं असतानाच, दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुद्धा सुरू झाली आहे. येत्या 20 जुनला विधानपरिषदेसाठी मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर भाजपकडून (bjp) सहा उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांना सहावा उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. विधानपरिषदेत आधीच पाचव्या उमेदवाराला मते कमी पडत असताना भाजपने सहाव्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांना निवडणूकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Legislative Council Election 2022 BJP candidate Latest News)

Sadabhau Khot Chandrakant patil
BIG Breaking : राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी तिसरा उमेदवार जाहीर

मित्र पक्षांना उमेदवारी दिली हे दाखवण्यासाठी भाजपने सदाभाऊ यांना उमेदवारी दिली की भाजपने त्यांचा बळीचा बकरा केला अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत बोलताना महत्वाची माहिती दिली आहे. राज्यसभेच्या पाचव्या जागेसाठी आधीच मतदान कमी पडत असताना सदाभाऊ खोत यांना उमेदवारी का दिली? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला. यावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

"भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय पार्लमेंट्री बोर्डाने राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाशजी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी पाच अधिकृत उमेदवार घोषीत केले. त्यातील चार अधिकृत उमेदवारांचा उमेदवारी अर्ज काल आम्ही भरले. पाचव्या जागेसाठी भाजप महिला मोर्चाच्या राज्याच्या अध्यक्षा, उमाताई खापरे यांचा उमेदवारी अर्ज आज आम्ही भरला आहे. याव्यतिरिक्त भाजपने शेतकऱ्यांचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचाही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. सदाभाऊ खोतांचा उमेदवारीला भारतीय जनता पार्टीचं समर्थन आहे. त्यामुळे पाच अधिकृत आणि एक अपक्ष अशा सहा जागेसाठी भाजप प्रयत्न करणार आहे". असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

Sadabhau Khot Chandrakant patil
भाजपची माेठी खेळी; विधान परिषदेसाठी सदाभाऊ खाेतांना उमेदवारी; फडणवीसांची घेणार भेट

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "सदाभाऊ खोत हे विशेषत: हे शेतकऱ्यांमधील लोकप्रिय नेतृत्व आहे. अलिकडच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सुद्धा त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह प्रत्यक्षात 15 दिवस आझाद मैदानावरील उपोषणात सहभागी होऊन सहभाग नोंदवला होता. त्यामुळे शेतकरी असो, किंवा राज्यातील अन्याय होणारा इतर नागरिक असो, त्यासाठी लढणाऱ्या सदाभाऊंना आमदार मतदान करतील" असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com