Raj Thckeray, Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीचं 'राज' काय? नेमकी काय झाली चर्चा? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे, पण या भेटीमागे आगामी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकी (Election) संदर्भात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तर काही दिवसांपासून मनसे आणि भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेतून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसह बंड केले आहे. सध्या राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी फडणवीस यांचे पत्र लिहून अभिनंदन केले होते. या पत्रावरुन फडणवीस आणि ठाकरे यांची जवळीक वाढली असल्याचे बोलले जात आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काही दिवसांनी होणार आहे. त्याअगोदर राज ठाकरेंची ही भेट महत्वाची मानली जात आहे. या मंत्रिमंडळात मनसेला मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अमित ठाकरे यांनी मंत्रिपद स्वीकारले तर त्यांना विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य व्हावे लागेल. मात्र, यापूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.

या अगोदरही देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंचे कौतुक केले आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन केले आहे. राज ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे.

हे देखील पाहा

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काही दिवसांनी होणार आहेत. या निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र येऊ शकतात असं बोलले जाज आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार काळात भोंग्यांविरोधात राज्यभरात मोठे आंदोलन सुरू केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rule Change: दिवाळी-दसऱ्याआधी महत्त्वाचे १५ बदल, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

Painting: मराठी चित्रकाराचं 67 कोटींचं पेन्टिंग, असं काय दडलंय त्यामध्ये? वाचा सविस्तर...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! eKYCच्या नावाखाली फेक वेबसाइट; नेमकं सत्य काय?

SCROLL FOR NEXT