राज ठाकरेंच्या उपस्थितीत सामूहिक हनुमान चालीसा पठण  SaamTvNews
मुंबई/पुणे

Pune : राज ठाकरेंच्या उपस्थितीत सामूहिक हनुमान चालीसा पठण, पहा Video

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौक मारुती मंदिर येथे हनुमानाची महाआरती पार पडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौक मारुती मंदिर येथे हनुमानाची महाआरती पार पडली. आजच्या या हनुमान महाआरतीस विशेष महत्व प्राप्त आहे. कारण, राज ठाकरेंनी (Raj Thackeray) गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा तसेच जर हे भोंगे उतरवले गेले नाहीत तर मशिदींसमोर लाऊडस्पिकर लावून दुप्पट आवाजात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावण्यात येतील असा इशारा राज यांनी दिला होता. यांनतर राज्यातील राजकारण कमालीचे ढवळून निघाले. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) नेत्यांनी राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर जोरदार टीका केल्या. तसेच राज ठाकरे धार्मिक तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवत असल्याचा आरोप शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता.

हे देखील पहा :

मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना आणि टीकांना उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंनी १२ एप्रिलला ठाण्यात 'उत्तर सभा' आयोजित करून मविआ मधील तीनही पक्षांच्या विविध नेत्यांवर जोरदार टीका केली व आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तसेच या सभेतील भाषणात राज यांनी भोंग्यांचा (Loudspeeker) मुद्दा पुन्हा उपस्थित करून ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढण्याचा अल्टिमेटम राज्यातील सर्व मशिदींच्या मौलवींना दिला व जर भोंगे काढले गेले नाहीत, तर ३ तारखेनंतर राज्यात मशिदींसमोर हनुमान चालीसा लावाव्यात असा आदेश त्यांनी मनसैनिकांना दिला. या सभेनंनतर पुण्यात (Pune) १६ एप्रिलला हनुमान जयंतीउत्सवानिमित्त (Hanuman Jayanti) राज ठाकरेंच्या हस्ते हनुमान महाआरती करण्यात येईल व हनुमान चालिसाचे सामूहिक पठण करण्यात येईल अशी भूमिका मनसेकडून (MNS) जाहीर करण्यात आली.

याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या हस्ते हनुमान मंदिरात महाआरती पार पडली. आरतीसाठी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत मनसैनिकांनी राज ठाकरेंचे जंगी स्वागत केले. या सोहळ्यासाठी मनसेकडुन जय्यत तयारी करण्यात आली होती. आरतीसाठी राज ठाकरेंनी खास भगवी शाल परिधान केली होती. आरतीनंतर सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मुक्ताईनगरातील उमेदवारांना 'झेड प्लस' सुरक्षा द्या: एकनाथ खडसे

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

SCROLL FOR NEXT