Raj Thackeray Saamtv
मुंबई/पुणे

MNS Padwa Melava: 'महाराष्ट्राच्या मनातील भावी मुख्यमंत्री...' मनसेकडून सेनाभवन परिसरात बॅनरबाजी; ठाकरे गटाला डिवचले

MNS Gudi Padwa Melava: मनसेकडून शिवाजी पार्क परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Raj Thackeray Banner: राज्यभरात मराठी नववर्षाचा आणि गुढी पाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. गुढी पाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे तसेच शोभायात्रेचे आयोजन केले आहे. सामान्यांमध्ये एकीकडे सण साजरा करण्याची लगबग सुरू असतानाच राजकीय मैदानात मात्र राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) सभेची उत्सुकता लागली आहे.

आज सायंकाळी शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरेंची तोफ आज कोणावर धडाडणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पुर्वी मनसेकडून सेना भवन परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.

गुढीपाडवा मेळावा निमित्त मनसेकडून शिवाजी पार्क परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे या आशयाचे बॅनर सेनाभवना समोर लावण्यात आले आहेत. दादर उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले आहेत. या बॅनरबाजीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

आज संध्याकाळी राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात धडाडणार आहे. मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. या मेळाव्याचा टीझरही मनसेकडून (MNS) जारी करण्यात आला होता. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Purse : महिलांनी प्रवास करताना पर्समध्ये 'या' ६ वस्तू कधीच ठेवू नयेत, जाणून घ्या कारण नाहीतर....

Mumbai Tourism : १८७५ पासून मुंबईची ओळख जपणारा 'हे' ठिकाण पाहिलं का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

CJP आंदोलनच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या निवासस्थानी 'इंडिया' आघाडीची बैठक; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये सायबर पोलिसांची मोठी कारवाई, १२ 'म्युल अकाउंट्स'विरोधात गुन्हा; बँक खाते भाड्याने द्यायचे अन्...

Maharashtra News Live Update: माळीण मार्गावरील वाहतूक ठप्प, पांचाळे गावाजवळ झाड कोसळले

SCROLL FOR NEXT