Raj Thackeray: हिंदुहृदयसम्राट? घाटकोपरमधील राज ठाकरेंच्या बॅनरमुळे चर्चेला उधाण...  जयश्री मोरे
मुंबई/पुणे

Raj Thackeray: हिंदुहृदयसम्राट? घाटकोपरमधील राज ठाकरेंच्या बॅनरमुळे चर्चेला उधाण...

आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील हिंदुहृदयसम्राट म्हणण्यास सुरुवात केली

जयश्री मोरे

मुंबई: दिवंगत शिवसेनाप्रमुख (Shiv Sena chief) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना शिनसैनिक (Shinsainik) हिंदुहृदयसम्राट असे म्हणत. मात्र, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. यामुळे आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना देखील हिंदुहृदयसम्राट म्हणण्यास सुरुवात केली आहे. आज घाटकोपर (Ghatkopar) येथे राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याकरिता कार्यकर्त्यांनी भले मोठे बॅनर लावले आहेत. यावर राज ठाकरे यांच्या नावासमोर हिंदुहृदयसम्राट असे लिहले फलक लावण्यात आले आहे. (Raj Thackeray banner Ghatkopar sparked discussion)

पहा व्हिडिओ-

यामुळे राज ठाकरेंच्या लावलेल्या त्या बॅनरची (banner) सध्या चर्चाला उधाण येत आहे. घाटकोपर येथे राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. याकरिता राज ठाकरे यांच्या स्वागताचे भले मोठे बॅनर्स मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी घाटकोपर, चेंबूर (Chembur) या ठिकाणच्या परिसरामध्ये लावण्यात आले आहेत. यामध्ये राज ठाकरे यांच्या नावासमोर हिंदुहृदयसम्राट लावण्यात आले आहे. मुंबई (Mumbai) महानगरपालिका ( (Municipal Corporation) निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे.

हे देखील पहा-

यातच आता मनसेने हिंदुत्वचा मुद्दा हाती घेतला आहे. यातच थेट राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे हिंदुहृद्यसम्राट म्हटल्यामुळे या बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा होत आहे. तसेच या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर (Social media) देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहेत. पुढील काही दिवसांमध्ये राज्यामध्ये महापालिका निवडणुकांची (elections) घोषणा होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या (Corona) वाढत्या रुग्णसंख्येने अनेक ठिकाणी महानगरपालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली नव्हती. (Raj Thackeray banner Ghatkopar sparked discussion)

मात्र, आता राज्यामध्ये कोरोनाचा धोका कमी झाला आहे. यामुळे लवकरच पालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर मोडली आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते सध्या दौरे करत असताना दिसून येत आहेत. यातच मुंबई महापालिकेची निवडणूक देखील सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. या निवडणुकाकरिता मनसेने देखील हालचाली सुरू केले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे देखील अॅक्टीव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

PM Modi Speech : सरकारी योजनांवरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, VIDEO

SCROLL FOR NEXT