Raj Thackeray
Raj Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

राज ठाकरेंनी मनसैनिकांना ॲाडियो क्लिपद्वारे केलं 'हे' आवाहन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: काही दिवसापूर्वी मनसे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती, पण डॉक्टरांनी कोरोना संसर्गाचे कारण देत त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलली आहे. आता १४ जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस होणार आहे. याच पार्श्वभूमीवर 0 राज ठाकरे यांनी मनसैनिकांनी आज सोशल मीडियावरुन ऑडियो क्लिपद्वारे आवाहन केले आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या सर्व टेस्ट केल्या, यावेळी कोरोनाचे डेड सेल्स सापडल्याने त्यांची शस्त्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली होती. आता पुन्हा तसाच कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून, यावेळी राज ठाकरे १४ जूनला कोणालाही भेटणार नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांनी आवाहन केले आहे.

राज ठाकरे यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात होत असतो, राज्यभरातून मनसैनिक मुंबईत येऊन शुभेच्छा देत असतात. मनसेचे (MNS) गटनेते, कार्यकर्ते, राज्यभरातून आदी येत असतात.

राज ठाकरेंच आवाहन काय आहे?

'माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, मी पुण्याच्या सभेत सांगितले होते माझ्यावर एक शस्त्रक्रिया करायची आहे. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी मी रुग्णालयात दाखल झालो, तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले कोरोनाचा डेड सेल आहे. त्यामुळे माझी शस्त्रक्रिया पुढे ढकलली. सध्या क्वारंटाईनमध्ये मी घरी आहे. आता १४ तारखेला माझा वाढदिवस आला आहे. प्रत्येकवर्षी मनसैनिक मला शुभेच्छा देण्यासाठी येत असतात, मलाही भेटल्यावर बरे वाटते, पण या १४ जून ला मला कोणालाही भेटता येणार नाही. कारण पुन्हा कोणता संसर्ग होऊ नये, यासाठी भेटता येणार नाही. म्हणून मी १४ तारखेला कोणालाही भेटणार नाही. आपण जिथे आहात तिथेच राहा. मला बरं वाटायला लागेल तेव्हा मी सर्वांना भेटेन. धन्यवाद.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वर्ल्डकप संघात स्थान मिळताच स्टार खेळाडूची सुपरफ्लॉप कामगिरी!ठरला राजस्थानच्या पराभवाचं कारण

Vastu Tips: कामाच्या टेबलवर ठेवू नका या वस्तू, नकारात्मकता वाढेल

Today's Marathi News Live : PM मोदींप्रमाणे एकही सुट्टी न घेता काम करतोय - CM एकनाथ शिंदे

Pankaja Munde: विजयासाठी योगदान द्या; सालगड्यासारखं काम करेल... पंकजा मुंडेंची मतदारांना साद

Baramati Lok Sabha News | Supriya Sule आणि Sunetra Pawar यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नोटीस, कारण काय?

SCROLL FOR NEXT