Raj Thackeray  Saam tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगिरी व्यक्त, कारण काय?

Raj Thackeray News : वरळीतील डोममध्ये विजय मेळावा पार पडल्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे. या पोस्टमधून राज ठाकरेंनी दिलगिरी व्यक्त केली.

Vishal Gangurde

मुंबई : मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे १८ वर्षांनंतर एकत्र आले. हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर आयोजित विजय मेळाव्यात मराठी माणसांची तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. वरळी डोमच्या सभागृहात आणि बाहेर तुफान गर्दी होती. या सोहळ्यात लोकांची रेटारेटी पाहायला मिळाली. राज्यभरातील राजकीय पक्षातील कार्यकर्ते आणि सामजिक कार्यकर्त्यांनी झाडून हजेरी लावली. मात्र, वरळीतील हा मराठी माणसांचा विजय मेळावा पार पडल्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिलगिरी व्यक्त केली आहे.

मुंबईच्या वरळीतील विजय मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासहित राज ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित केलं. या सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांसहित मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही हजेरी लावली. हजारो मराठी लोकांचा मेळावा पार पडल्यानंतर राज ठाकरेंनी भाषणात एक उल्लेख राहून गेल्याने सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली.

राज ठाकरे म्हणाले, 'हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसानं सरकारला झुकवलं. त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला. त्याबद्दल आधीच दिलगिरी व्यक्त करतो'.

'हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार. मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो, असेही राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी भाषणानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना टाळी दिली. दोघेही भाऊ खळखळून हसले. या दोघांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उत्तर महाराष्ट्रात आजपासून थंडीच्या लाटेचा इशारा

PM Kisan Yojana: आज ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२००० जमा होणार; तुम्हाला येणार की नाही? अशा पद्धतीने करा चेक

Nachni Bhakri Tips: नाचणीची भाकरी थापताना तुकडे पडतात? शेकल्यावर लगेचच कडक होते? "ही" घ्या भाकरीची परफेक्ट रेसिपी

Maharashtra Government: छोटे भूखंड नियमित करण्याचे निर्देश, ३ कोटी नागरिकांना फायदा होणार

Success Story: घर आणि नोकरी सांभाळत दिली UPSC; दोन लेकींची आई ४०व्या वर्षी झाली IAS; निसा उन्नीराजन यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT