Mumbai Local Train Water Leak Video Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : मुंबई लोकल ट्रेनच्या छताला गळती, प्रवाशांचा चक्क रेनकोट घालून प्रवास; VIDEO तुफान व्हायरल

Mumbai Local Train Water Leak Video : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमधील एका डब्याला पावसामुळे गळती लागल्याचं या व्हिडीओतून दिसू येत आहेत. यामुळे प्रवासी ओलेचिंब झाले असून त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Satish Daud

फैय्याज शेख, साम टीव्ही प्रतिनिधी

सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणचे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेली आहेत. मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. अशात मुंबईतील लोकल ट्रेनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमधील एका डब्याला पावसामुळे गळती लागल्याचं या व्हिडीओतून दिसू येत आहेत. यामुळे प्रवासी ओलेचिंब झाले असून त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहेत. अशा परिस्थितही काही प्रवासी ट्रेनमधून छत्री घेऊन प्रवास करताना दिसत आहेत. लोकल ट्रेनला मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखलं जातं.

दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. लोकल थांबली की मुंबईकरांची मोठी वाताहात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून याच लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहेत. कधी पावसामुळे रेल्वेरुळावर पाणी साचल्याने लोकलला उशीर होतो. तर कधी अचानक घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेन्स रद्द करण्यात येतात.

लोकलच्या फेऱ्या कमी असल्यामुळे प्रवाशांना जीवघेण्या गर्दीतून प्रवास करावा लागतो. अशावेळी अनेक प्रवाशांच्या लोकलमधून पडून मृत्यू झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. आता तर लोकल ट्रेनमध्ये चक्क पावसाच्या पाण्याची गळती लागल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान, लोकलमधील गळतीचा व्हिडीओ समोर येताच अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. रेल्वे प्रशासनाला प्रवाशांची काळजी आहे की नाही? असा सवाल अनेकजण उपस्थित करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला हा व्हिडीओ कसारा-सीएसएमटी लोकल ट्रेनमधील आहे. ही लोकल सकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी कसाऱ्याहून सीएसएमटीकडे रवाना होते.

लांब पल्ल्याची गाडी असल्यामुळे या ट्रेनमध्ये प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. सध्या मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे या लोकल ट्रेनच्या एका डब्याला गळती लागल्याचं दिसून येत आहे. यामुळे प्रवाशांना पावसात भिजूनच प्रवास करावा लागत आहे. दुसरीकडे रेल्वे प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचं दिसून येतंय. याकडे तत्काळ लक्ष द्यावं, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT