Rain Update Saam Tv
मुंबई/पुणे

Rain Update| राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी

गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा जोर धरला आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने (Rain) आता पुन्हा जोर धरला आहे. दोन दिवसापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आता पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी आणि बुधवारी कोल्हापूर, पुणे,सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.(Rain Update)

येत्या दोन दिवसात राज्यातील बुततांश भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसारख्या किनारी जिल्ह्यांतील निर्जन भागांमध्ये येत्या शुक्रवार ते रविवार या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तण्यात आली आहे. (Rain Update)

तर पुण्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. कोल्हापुरात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा धरणाचे काल स्वयंचलित दरवाजे उघडले होते, त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा पावसाने जोर धरला आहे. राज्यातील धरणांच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. तर मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Shave Bhaji Recipe : एक टोमॅटो अन् वाटीभर शेव, रात्रीच्या जेवणाला झटपट बनवा 'हा' पदार्थ

Ashadh Wari: विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्याला अमानुष मारहाण, पंढरपुरात सुरक्षा रक्षकांची मुजोरी|VIDEO

Language Row : मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांची दिलगिरी; मराठी अस्मिता मोर्चाआधीच निर्णय

Amravati News: अमरावतीत बॉम्बची अफवा, 'या' परिसरात शोधमोहीम सुरू, पोलिसांचा मोठा फौजफाटा|VIDEO

Salt Scrub : मीठाचे पाणी त्वचेसाठी चांगले आहे का?

SCROLL FOR NEXT