संतापजनक! नाशिकमध्ये डॉक्टरचा अल्पवयीन परिचारीकेवर अत्याचार

नाशिकमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे.
Nashik Crime News
Nashik Crime NewsSaam tv
Published On

नाशिक: नाशिकमधून (Nashik) एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने खासगी रुग्णालयात प्रशिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन परिचारीकेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी (Police) डॉक्टरला ताब्यात घेतले आहे.

मिळालेली माहिती अशी, एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी अल्पवयीन परिचारिकेवर डॉक्टरने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉ. उल्हास पांडुरंग कुटे (५० रा,मोरवाडी ) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले डॉ. उल्हास कुटे हे शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये गेले, यावेळी त्या ठिकाणी एक सोळा वर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिका होती.

Nashik Crime News
Asia Cup 2022 : हसरंगाची कमाल अन् लंकेची धमाल, श्रीलंका चॅम्पियन, पाकिस्तानचा दारूण पराभव

ती रूममध्ये एकटी असल्याचे निमित्त साधून हातपाय दुखत असल्याच्या निमित्ताने तिच्या रूमच्या आत प्रवेश करीत दरवाजाची कडी लावून डॉक्टर कुटे यांनी पीडित परिचारिकेवर अत्याचार केले. यानंतर झालेला प्रकार कुणाला सांगितल्यास पीडितेला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली.

Nashik Crime News
Asia Cup 2022 : श्रीलंकेचा 'राजा'पक्षा चमकला, पाकिस्तानसमोर १७१ धावांचं आव्हान

प्रकरणी पीडित परिचारिकेने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे याच्याविरोधात भा.द.वी. कलम ३७६, ५०४, तसेच लैंगिक अत्याचार संरक्षण पोस्को कायद्याअंतर्गत तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केली आहे. डॉक्टरने आपल्या खासगी हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन परिचारिकेवर बळजबरी केल्याने याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस (Police) आयुक्त सोहेल शेख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख, महिला पोलीस उपनिरीक्षक सोनल फडोळ करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com