Pune Dam Water Level Today Saam TV
मुंबई/पुणे

Pune Dam Water Storage: पुणेकरांसाठी गुडन्यूज! पाण्याची चिंता मिटली, कोणत्या धरणात किती पाणीसाठा? वाचा सविस्तर

Pune Dam Water Storage: पावसाच्या या तुफान बॅटिंगमुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ९९ टक्के पाणीसाठी तयार झाला आहे. त्यामुळे पुणेकरांचे पाण्याची चिंता मिटली आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. २ सप्टेंबर २०२४

सध्या महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये मागच्या काही आठवड्यांत पावसाने थैमान घातले होते. गेल्या १५ दिवसांपासून पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. पावसाच्या या तुफान बॅटिंगमुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ९९ टक्के पाणीसाठी तयार झाला आहे. त्यामुळे पुणेकरांचे पाण्याची चिंता मिटली आहे.

पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली!

पुणेकरांसाठी एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या ९९ टक्के इतका पाणीसाठा तयार झाला आहे. तर जिल्ह्यातील ४ धरणात मिळून २८ टीएमसी इतके पाणी आहे. सध्या पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग बंद करण्यात आला आहे.

कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात सध्या ९३.३१ टक्के इतका पाणीसाठा आहे तर पानशेत धरणात ९८.९७ टक्के पाणीसाठा, वरसगाव धरणात ९९.१० टक्के आणि टेमघर धरणात १०० टक्क इतका पाणीसाठा आहे. शहराला पाणी पुरवठा करणार ही चारही धरणे १०० टक्के भरण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे.

लातूरमध्ये पावसाचा कहर

लातूरच्या रेणा मध्यम प्रकल्पात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. धरण क्षेत्रातल्या भागात रात्री पासून पावसाचा जोर वाढल्याने पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तर काही वेळात धरण भरल्यानंतर प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात येणार आहेत. दरम्यान बैल पोळा सणाच्या पूर्वसंध्येलाच धरण भरताना पाहून या भागातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT