Rain Alert Saam TV
मुंबई/पुणे

येत्या ५ दिवसांमध्ये कोसळणार धोधो पाऊस; राज्यातील 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

राज्यात येत्या ५ दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई: राज्यात येत्या ५ दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा (Rain) इशारा हवामान विभागाने दिला आहे. उद्यापासून मुंबई ठाणे परीसरासह कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचंही हवामान विभागाकडून (Department of Meteorology) सांगण्यात आलं आहे.

मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने कालपासून मुंबई (Mumbai) ठाणे आणि नवी मुंबई परिसरात जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता काही दिवसांपुर्वी वर्तवली होती.

पाहा व्हिडीओ -

त्यानुसार काल मुंबई, नवी मुंबई,परिसरात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला होता. शिवाय आज देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे कामावरुन घरी जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीचं तारांबळ उडाली होती.

अशातच आता हवामान विभागाने आणखी येत्या ५ दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पश्चिम महाराष्ट्रसह विदर्भाला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार आता काल बुधवारपासून राज्यभरात पावसाचा जोर वाढल्याचं दिसतं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकीची e KYC करण्याचा निर्णय का घेतला? कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Sleep Routine: दररोज ८ तास झोपल्यानंतरही प्रकृती बिघडू शकते? Sleeping Time म्हणूनच महत्वाचा

Sambhajinagar: अतिवृष्टीनं पीक गेलं, मुलीच्या कॉलेजची फी कशी भरायची? हतबल झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

Hingoli Crime : दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत दोन गटात राडा; दगडफेक करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण

SCROLL FOR NEXT