Railway Megablock
Railway Megablock Saam Tv
मुंबई/पुणे

Railway Megablock: पुढील २ दिवस रेल्वे प्रवास करायचा विचार करताय? ही बातमी नक्की वाचा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईत ४ आणि ५ जून रोजी मध्य रेल्वे, (Central railway ) रेल्वे मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक (Mega Block ) घोषित केला आहे. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने ही महत्वाची माहिती दिली आहे. (Mega Block Latest News In Marathi )

आज ३ जून मध्य रेल्वे दादर स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिज गर्डर काढण्यासाठी मेगाब्लॉक आहे. ठाकुर्ली स्थानकावरील एन-टाइप जुना फूट ओव्हर ब्रिज पाडण्यासाठी रात्रीची ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करणार आहे. त्यामुळे ३ जून ते ४ जून २०२२ रोजी शुक्रवार आणि शनिवारी भायखळा - माटुंगा अप आणि डाउन जलद मार्गावर ००.४० ते ०६.०० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

एक्सप्रेस गाड्यांमध्येही (Central railway )बदल करण्यात आला आहे. ब्लॉक वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणार्‍या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या माटुंगा ते भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावरून वळवण्यात आली आहे. या गाड्या दादर येथे दोनवेळा थांबतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी डाउन मेल/एक्स्प्रेस (22105 इंद्रायणी एक्स्प्रेस) भायखळा आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल, आणि दादर येथे दोनवेळा थांबणार आहे.

उपनगरीय गाड्यांचे मार्गबदल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणार्‍या/सुटणार्‍या अप आणि डाउन जलद मार्गावरील उपनगरीय लोकल गाड्या नियोजित थांब्यानुसार थांबणार आहेत. माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप/डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत.

शनिवारीही असणार मेगाब्लॉक

शनिवार ४ ते ५ जून रोजीही मेगाब्लॉक असणार आहे. शनिवारी आणि रविवारी रात्री ००.४० ते ०५.४० पर्यंत भायखळा - माटुंगा डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

डाउन मेल/एक्स्प्रेस ट्रेनचे मार्गबदल

१२०५१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि दादर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर दोनदा थांबणार आहे.

डाउन उपनगरीय गाड्यांचे मार्गबदल

ब्लॉक कालावधीत डाउन जलद मार्गावरील उपनगरीय सेवा डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्या गाड्यांच्या नियोजित(Central railway ) थांब्यांनुसार थांबणार आहेत.

शनिवारी ४ जून आणि रविवारी ५ जूनला ०१.१५ ते ०३.३५ पर्यंत कल्याण - दिवा अप आणि डाउन जलद/धिम्या मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.५१ वाजल्यापासून ००.२४ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या गाड्या कोपर व ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाहीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Met Gala 2024मध्ये सौंदर्यवतींच्या नजाकती, फॅशनवर खिळल्या नजरा

PM Modi In Beed: गोपीनाथ यांच्यासोबत माझं घनिष्ट नातं, PM मोदींकडून मुंडेंच्या आठवणींना उजाळा

EVM हॅक करण्यासाठी सुट्टीवर आलेल्या सैनिकाचा अंबादास दानवेंना फोन; कोण आहे मारूती ढाकणे

Live Breaking News : सोलापुरात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने

Ambadas Danve News : अडीच कोटीत Evm हॅक! अंबादास दानवेंना कुणी दिली ऑफर?

SCROLL FOR NEXT