express Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: पुणेकरांनो कृपया लक्ष असूद्या! रेल्वे मार्गावर ३ दिवसांचा ब्लॉक, लोकल- एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल

Pune Local Train Schedules to Change Due to 3-Day Block: लोणावळा - मळवली रेल्वे विभागातील उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी ६ ते ८ एप्रिल २०२५ या कालावधीत तीन दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Bhagyashree Kamble

लोणावळा - मळवली रेल्वे विभागातील उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी तीन दिवसीय ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ६ ते ८ एप्रिल दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. या ब्लॉक कालावधीत लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात आणि पुणे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

या ब्लॉकचा परिणाम एक्सप्रेससह लोकल गाड्यांवर होणार असून, काही गाड्या शॉर्ट टर्मिनेटही केल्या जातील. तर, काही वेळापत्रकानुसार नियमित केल्या जातील.

मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा-मळवली विभागातील अप आणि डाऊन मार्गावर ४ स्टील गर्डर्सच्या उभारणीसाठी हा ब्लॉक आवश्यक असून, पायाभूत सुविधा आणि प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्लॉकचे वेळापत्रक आणि गाड्यांचे नियोजन

पहिला ब्लॉक – ६ एप्रिल (दुपारी १:०५ ते ४:०५)

सीएसएमटी–चेन्नई एक्सप्रेस (22159): लोणावळा येथे ४:०५ पर्यंत नियमित केली जाईल.

एलटीटी–काकीनाडा एक्सप्रेस (17222): कर्जत येथे ३:२० पर्यंत नियमित केली जाईल.

ग्वाल्हेर–दौंड एक्सप्रेस (22194): १० मिनिटांसाठी नियमित केली जाईल.

पुणे–लोणावळा ईएमयू व शिवाजीनगर–लोणावळा ईएमयू: मळवली येथे शॉर्ट टर्मिनेट.

लोणावळा–पुणे व लोणावळा–शिवाजीनगर ईएमयू: मळवलीहून सुटणार.

दुसरा ब्लॉक – ७ एप्रिल (दुपारी १:०५ ते २:३५)

शिवाजीनगर–लोणावळा ईएमयू: मळवली येथे शॉर्ट टर्मिनेट.

लोणावळा–पुणे ईएमयू: मळवलीहून सुटणार.

तिसरा ब्लॉक – ८ एप्रिल (दुपारी १:०५ ते ३:०५)

शिवाजीनगर–लोणावळा ईएमयू: मळवली येथे शॉर्ट टर्मिनेट.

लोणावळा–पुणे ईएमयू: मळवलीहून धावेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT