Rahul Gandhi supports MPSC students protest in Pune saam tv
मुंबई/पुणे

एक इंचही मागे हटणार नाही; MPSC विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींचं फडणवीस सरकारला चॅलेंज, VIDEO

Rahul Gandhi Supports MPSC Aspirants : पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला. त्यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकतेचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.

Bharat Jadhav

राहुल गांधींचा पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राहुल गांधींचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

राहुल गांधींचं फडणवीस सरकारला MPSC आंदोलनावरून आव्हान

MPSC आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्यातील फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांसोबत आम्ही आहोत, एक इंचही मागे हटणार नाही, असंही ते म्हणाले. महाराष्ट्रातील एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचं पुण्यात सुरु असलेलं आंदोलन आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय. महाराष्ट्रातील विद्यार्थी फडणवीस सरकारची शिक्षण व्यवस्था आणि अन्यायानं त्रस्त आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

काय म्हणाले राहुल गांधी?

महाराष्ट्रातील विद्यार्थी फडणवीस सरकारची शिक्षण व्यवस्था आणि अन्यायानं त्रस्त आहे. आदिवासी विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी बस आणि पायी प्रवास करून मुबंईत पोहोचले. आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये मूलभूत सुविधा या त्यांच्या मागण्या आहेत. मुलांचा तो हक्कच आहे.

मुंबईत थांबण्यासाठी जागा नव्हती, तर काँग्रेसने त्यांना टिळक भवनात व्यवस्था करून दिली. पण सकाळ होण्याआधीच पोलीस काँग्रेस कार्यालयाच्या आत घुसले आणि या मुलांना घेऊन गेले. आझाद मैदानात आंदोलन सुरू होण्याआधीच ही कारवाई करण्यात आली. जी मुले नाशिकहून पायी चालत मुंबईत आले त्यांना अशा प्रकारची वागणूक मिळाली, याकडेही राहुल गांधींनी लक्ष वेधले.

तिकडे पुण्यात एमपीएससी विद्यार्थी 'सत्याग्रह' आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागण्या काही नवीन नाहीत. मी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत या मुद्द्यावर बोललो होतो. तेव्हा काही झालं नाही. त्यामुळेच ही मुले आज रस्त्यावर उतरली आहेत. मी आणि काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. आम्ही एक इंचही मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिकाही राहुल गांधींनी घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिक्षक मतदारसंघात महायुतीत फूट, महायुतीत पाचही जागांवर बंडखोर

Latest New Mangalsutra Designs For Women: नवीन मंगळसूत्र घ्यायचंय? सध्या ट्रेंडमध्ये आहेत 5 डिझाईन्स

ड्रग्ज सेवनामुळे एकाचा मृत्यू, शौचालयात ड्रग्जची डर्टी पार्टी

Cashews Vs Almonds: काजू आणि बदाम, आरोग्यासाठी कोणतं ड्रायफ्रुट्स फायदेशीर?

Maharashtra News Live Update: पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर नामनिर्देशन पत्र दाखल

SCROLL FOR NEXT