Pune Muncipal Corporation Election 2025 - 2026 Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : मोठी बातमी! पुण्यात ठाकरेसेना आणि काँग्रेसची युती, कोण किती जागा लढवणार?

Pune Muncipal Corporation Election 2025 - 2026 : पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसला ६० तर उबाठा गटाला ४५ जागा देण्यात आल्या आहेत.

Alisha Khedekar

  • पुण्यात काँग्रेस–शिवसेना (UBT) युती अधिकृत जाहीर

  • काँग्रेसला ६० जागा , उबाठा गटाला ४५ जागा

  • मनसे युतीपासून दूर

  • पुणे महापालिका निवडणुकीला नवे वळण

अक्षय बडवे, पुणे

राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची हात मिळवणी झाली आहे. हे दोन्ही गट एकत्ररित्या पुण्यातील महापालिकेच्या निवडणुकीसाठी लढणार आहेत. मात्र काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत मनसे जायला तयार नसल्याचं म्हटलं जात आहे. काँग्रेस आणि उबाठा गटाच्या पुण्यातील युती नंतर दोन्ही गटाच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे.

राज्यात महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर तब्बल २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आल्यांनतर, आता पुण्यातील महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेना गटाकडून काँग्रेसशी युती करण्यात आली आहे. या युतीत मनसेचा सहभाग नसल्याचं म्हटलं जात आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि उबाठा गटाच्या युतीबाबत घोषणा करण्यात आली. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून पुण्याचे चांगले व्हावे यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. शिवाय या पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि उबाठा गटाकडे किती जागा देण्यात आल्या याबाबत भाष्य करण्यात आलं.

उबाठा गटाला ४५ जागा देण्यात आल्या आहेत. तर, ६० जागा काँग्रेसला देण्यात आल्या आहेत. मनसेकडून ३२ जागांची मागणी करण्यात आली पण शिवसेनेकडून २१ जागा दिल्या जात आहेत. त्यामुळे मनसेने काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान शिवसेना मनसेसोबत चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे. आता हा जागा वाटपाचा तिढा सुटणार की वाढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Quick Vegetarian Dinner: 30 मिनिटांत तयार होणाऱ्या झटपट डिनर रेसिपीज

नाशिकचं राजकारण 360 डीग्री फिरलं! महायुती फुटली, भाजप स्वबळावर; महाविकास आघाडीत नव्या भिडूची एन्ट्री

नव्या वर्षात ५ गोष्टींच्या नियमात होणार मोठा बदल; UPI ते आधार कार्डमध्ये काय होणार बदल?

Salman Khan: 'भाऊंची भेळ...'; सलमान खानने रितेशसाठी बनवली खास भेळ, जेनिलियाने पोस्ट केलेला VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार

SCROLL FOR NEXT