Radhakrishna Vikhe Patil saam tv
मुंबई/पुणे

Radhakrishn Vikhe Patil News : अजित पवारांच्या एन्ट्रीने भाजप नेत्यांना फटका, मंत्रिमंडळ पायाभूत समितीतून राधाकृष्ण विखे पाटील यांची गच्छंती

Political News : विखे पाटलांऐवजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची या समितीवर वर्णी लागली आहे.

Rashmi Puranik

Mumbai News :

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची एन्ट्री झाल्याने अनेक भाजप नेत्यांना फटका बसला आहे. गिरीश महाजन यांनी अजित पवारांच्या येण्याने माझं मंत्रिपद गेल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांना फटका बसला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीमधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना डच्चू देण्यात आला आहे. विखे पाटलांऐवजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची या समितीवर वर्णी लागली आहे. (Latest Marathi News)

अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर विखेपाटील यांची समितीमधून गच्छंती झाली आहे. आता मंत्रिमंडळ पायाभूत समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. या समितीमध्ये देवेंद्र फडणवीस , अजित पवार, दिलीप वळसे पाटील, उदय सामंत, रवींद्र चव्हाण, अतुल सावे आणि दादा भुसे यांचा समावेश आहे. (Political News)

राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले?

मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीतून वगळल्याबाबत राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतात तो विचारपूर्वक घेतात. समन्वय रहावे म्हणून कदाचित त्यांनी निर्णय घेतला असावा. त्या समितीत स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे मी असो किंवा नसो काही फरक पडत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT