radhakrishna vikhe patil criticizes congress leader balasaheb thorat  saam tv
मुंबई/पुणे

Nagar : काँग्रेसच्या विरोधात काम करणाऱ्यांनी आम्हांला पक्षनिष्ठा शिकवू नये : विखे-पाटलांचा थाेरातांना टाेला

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Nagar News :

ज्यांच्या दिव्याखाली अंधार आहे त्यांनी आम्हाला शिकवू नये. काँग्रेसच्या विरोधात काम करणाऱ्यांनी आम्हाला पक्षाच्या निष्ठेविषयी ज्ञान देऊ नये असे विविध निवडणुकांचे दाखले देत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना टाेला लगावला. संगमनेर मतदारसंघात विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झाले. त्यावेळी विखे-पाटील बाेलत हाेते. (Maharashtra News)

काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांनी पक्ष बदलावरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावर विखे-पाटील म्हणाले आता तर त्यांच्या फ्लेक्स वरून सोनिया आणि राहुल गांधी देखील गायब झाल्याचे दिसून येत आहे. कोणत्या दिशेला चालले हे समजत नाही, आमच्याकडे तर हाउसफुल झालंय असा टाेला विखेंनी थाेरात यांना लगावला.

अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज (chattrapati shivaji maharaj) यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. इतक्या वर्षात संगमनेर शहरात साध स्मारक देखील उभे राहू शकले नाही असेही विखे-पाटील यांनी म्हटले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आमच्यावर पक्ष बदलण्याची टीका काँग्रेसचे मित्र करतात पण आम्ही जे करतो ते डंके की चोट पर जाहीरपणे करतो असेही विखेंनी म्हटले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT