Sambhaji Brigade Saam Tv
मुंबई/पुणे

लेखक जेम्स लेनच्या स्पष्टीकरणावर संभाजी ब्रिगेडचे सवाल

राज्याच्या राजकारणात जेम्स लेनचा मुद्दा गाजला होता. आता पुन्हा जेम्स लेनचा मद्दा पुढे येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा जेम्स लेन आणि बाबासाहेब पुरंदरेंचा मुद्दा चर्चेत आणला आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोनवेळा त्याबद्दल विधाने केली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा जेम्स लेनचा मुद्दा गाजत आहे. जेम्स लेन याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक पुस्तक लिहिले आहे. यात त्याने वादग्रस्त लिखान केले आहे, यावरुन याअगोदरही वाद झाले होते. आता पुन्हा तो वाद राज्याच्या राजकारणात पुढं आला आहे. जेम्स लेनने यावर स्पष्टीकरण दिले आहे, यावर आज संभाजी ब्रिगेडने लेखक जेम्स लेनच्या स्पष्टीकरणावर सवाल उपस्थित केले आहेत.

जेम्स लेन (James Lane) याने एका मुलाखतीमध्ये, “ या पुस्तकासाठी कुणीही माहिती पुरवली नाही. शिवरायांवरील पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे माहितीचा स्त्रोत नव्हते, असं म्हटले आहे. यावरुन आता संभाजी ब्रिगेडने सवाल उपस्थित केले आहेत.

संभाजी ब्रिगेडचे काय आहेत सवाल?

संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी हे सवाल उपस्थित केले आहेत. जेम्स लेनच्या 'शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकातील मजकूर आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती कादंबरीतील मजकूर सारखाच हा योगायोग समजावा का?

पुण्यात येऊन एखादा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहितो आणि आणि तो शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेत नाही हे शक्य आहे का?

जेम्स लेन चे पुस्तक माहीत असल्याशिवाय, बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यावेळच्या व्याख्यानमालेत जेम्स लेनच्या पुस्तकाचा उल्लेख केला? वृत्तपत्रात लेखही लिहिले?

इतिहास अभ्यासक जयसिंगराव पवार आणि वसंत मोरे यांनी शेवटपर्यंत जेम्स लेनच्या पुस्तकाचा निषेध केला तसा बाबासाहेब पुरंदरे यांनी का केला नाही?

ऑक्सफर्ड'ला पाठवलेल्या पत्रावर बाबासाहेबांची केवळ सही, बाबासाहेबांनी ते पत्र पाठवले नाही, असं संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.

जेम्स लेन नव्वदच्या दशकाच्या महाभारताचा अभ्यास करण्यासाठी आला होता. त्याने पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत अभ्यासाला सुरुवात केली. यावेळी त्यांने छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकांवरील प्रभाव पाहिला आणि त्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहायचं ठरवले. जून २००३ मध्ये जेम्स लेनचे 'शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' हे पुस्तक ऑक्सफर्ड प्रकाशनाने प्रकाशित केलं. यानंतर या पुस्तकातील वादग्रस्त मजकुरामुळे राज्यात वाद सुरु झाला.

यावेळी डॉक्टर जयसिंगराव पवार, बाबासाहेब पुरंदरे, गजानन भास्कर मेहेंदळे, निनाद बेडेकर, वसंत मोरे आणि आणखी दोन इतिहास संशोधकांनी ऑक्सफर्ड इंडिया प्रेस या प्रकाशन संस्थेला पत्र लिहून पुस्तक मागे घेण्याची मागणी केली. पुढं २१ नोव्हेंबरला ऑक्सफर्ड प्रेसने पत्र पाठवून माफी मागितली होती.

त्यावेळीही राज्याच्या राजकारणात जेम्स लेनचा मुद्दा गाजला होता. आता पुन्हा जेम्स लेनचा मद्दा पुढे येत आहे. यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT