Qubool Hai: तो निकाहनामा खरा! वानखेडेंच्या वडिलांनी केलं कबूल... Saam Tv News
मुंबई/पुणे

Qubool Hai: तो निकाहनामा खरा! वानखेडेंच्या वडिलांनी केलं कबूल...

समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानेश्वर वानखेडे यांनी हा निकाहनामा खरा असल्यांचं जाहिरपणे मान्य केलं आहे. मात्र या निकाहनाम्यात त्यांचं नाव दाऊद कसं आलं हे यावर त्यांना स्पष्टपणे सांगता आलं नाही.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्विकारला होता असा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी केला होता. तसेच समीर वानखेडेंचा विवाह नाही तर मुस्लिम पद्धतीने निकाह झाल्याता दावा करत मलिकांनी त्यांचा निकाहनामा देखील ट्विटरवर शेयर केला होता. हा निकाहनामा खरा असल्याचं आता समोर आलं आहे. समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानेश्वर वानखेडे यांनी हा निकाहनामा खरा असल्यांचं जाहिरपणे मान्य केलं आहे. मात्र या निकाहनाम्यात त्यांचं नाव दाऊद कसं आलं हे यावर त्यांना स्पष्टपणे सांगता आलं नाही. (Qubool Hai: that marriage certificate! Wankhade's father confessed)

हे देखील पहा -

समीर वानखेडेंचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी आपण जन्माने हिंदुच असून इस्लाम स्विकारला नसल्याचं म्हंटलयं. ते म्हणाले की, "जेव्हा मी जन्माने एससी (SC) असून माझा मुलगा मुसलमान कसा असू शकतो? माझे सगळे नातेवाईक एससी आहेत, सोपी गोष्टी त्यांना कळू नये? मला अत्यंत वाईट वाटतंय, माझा मुलगा चांगलं काम करतोय, कोणी असं केलं नाही, पण नवाब मलिक यांच्या जावयावर कारवाही केली म्हणून आकसापोटी ते असं वागतायत असा आरोप डी. के. वानखेडेंनी केलायं. ते म्हणाले, ''मी जन्माने एससी आहे, मग मी मुस्लिम कसा होऊ शकतो? मौलवी १००% खोटं बोलतायत, मी धर्म बदलला नाही. मी काल टीव्हीवर पाहिलं, रोहतगी वकील आहेत. त्यांचं आणि समीरचं कोणतंही बोलणं झेल नाही.

खंडीचा प्रश्नच येत नाही. माझ्याकडे सगळे प्रमाणपत्र आहेत. जातीचा दाखला माझ्याकडे आहे. त्यात 'समीर कचुरुजी वानखडे' नाव आहे. माझ्या मुलाचे स्पेशल मॅरेज ऍक्टनुसार हे नाव आहे. मी मानहानी दावा दाखल करणार आहे. पैसे देऊन या पंचाला फिरवलं आहे. निकाहनामा खराच, पण त्यावर माझं दाऊद नाव चुकीचं आहे. माझ्या बायकोने ते चुकून केलं असावं, ती या जगात ते सांगायला नाही असं ते म्हणाले आहेत.

मेहेर 33 हजार दिलेत का? या प्रश्नावर डी. के. वानखेडे म्हणाले की, "हे खर असावं, मला उर्दू येत नाही, मुस्लिम पद्धतीने निकाह झालाय, त्यांनी मेहेर ३३ हजार दिले असणार असं ते म्हणाले. त्यांच्या या कबुलनाम्यामुळे मंत्री नवाब मलिकांच्या दाव्यात तथ्य होतं हे स्पष्ट होत असलं तरी समीर वानखेडे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं झालंय. मात्र समीर वानखेडे सध्या अडचणीत सापडत असल्याचं दिसतंय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Camera Phone : फोटोग्राफी प्रेमींसाठी सर्वोत्तम स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari: 'याची गर्लफ्रेंड त्याची बायको...'; वरुण- जान्हवीच्या लव्हस्टोरीमध्ये कॉमेडीचा तडका

प्रायव्हेट पार्टवर २३ ठिकाणी स्टेपलर मारले, नंतर पेपर स्प्रे मारत...; कपलचे २ तरुणांसोबत भयंकर कृत्य

Maharashtra Live News Update: सांगलीमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

Sharad Pawar : 'देवाभाऊ' नेपाळमध्ये काय झालं बघा; शरद पवारांनी शेतकऱ्यांचा प्रश्नांवरून सरकारवर ओढले आसूड

SCROLL FOR NEXT