A large python rescued from inside a furniture showroom in Kalyan West’s Gandhari area. Saam tv
मुंबई/पुणे

फर्निचर खरेदीला गेले आणि समोर आला भला मोठा अजगर… कल्याणमधील धक्कादायक प्रकार

Massive Python Rescued From Showroom In Kalyan West: कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरात फर्निचर शोरूममध्ये अजगर आढळल्याने खळबळ उडाली. वार फाउंडेशनच्या मदतीने अजगराला सुरक्षित पकडण्यात आले.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणमध्ये फर्निचर शोरूममध्ये अजगर शिरल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील गंधारी परिसरात एका फर्निचरच्या शोरूममध्ये भलामोठा अजगर शिरल्याची घटना घडली. अचानक समोर आलेल्या या अजगरामुळे शोरूममधील कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच वॉर फाऊंडेशनच्या सदस्यांना बोलावण्यात आले. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अजगाराला मोठ्या शिताफीने पकडले.

यानंतर पकडलेल्या अजगराला सुरक्षितरित्या अग्निशमन विभागाच्या ताब्यात देनये आले. या संपूर्ण कारवाईदरम्यान कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र गांधारी परिसरात अजगर आढळण्याची ही तिसरी घटना असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात वन्यजीवांचा वावर वाढत असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

SCROLL FOR NEXT