Maharashtra Housing Society Rules Explained Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Housing Society : घरमालकांसाठी महत्त्वाचा नियम! फ्लॅट भाड्यानं देताना केली १ चूक, पुण्यात १३० जण अडचणीत; कायदा काय सांगतो? वाचा

Pune tenant verification online : पुण्यात भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे नोंदवणे घरमालकांसाठी महत्त्वाचे आहे. गेल्या दोन महिन्यांत १३० घरमालकांवर कारवाई झाली असून, घर भाड्याने देताना कोणत्या ५ गोष्टींची काळजी घ्यावी, जाणून घ्या.

Akshay Badve

Maharashtra Housing Society Rules Explained : आयटी हब असो किंवा शिक्षणाचे माहेरघर, गेल्या काही वर्षांत पुणे शहराचा विस्तार चहुबाजूने वेगाने होत आहे. केवळ राज्यातीलच नव्हे, तर राज्याबाहेरून आणि परदेशातूनही अनेक नागरिक विविध कारणांसाठी पुण्यात वास्तव्यास येत आहेत. परिणामी, शहरातील अनेक घरमालकांनी आपले फ्लॅट किंवा जागा भाड्याने दिल्या आहेत.

या भाडेकरूंची संपूर्ण माहिती स्थानिक पोलिसांना देणे घरमालकांसाठी बंधनकारक असून, याबाबत पुणे शहर पोलिसांनी यापूर्वी अनेकदा स्पष्ट आदेश जारी केले आहेत. मात्र, असे असतानाही काही घरमालक कोणताही अधिकृत करार किंवा कागदोपत्री व्यवहार न करता घर भाड्याने देत असल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे. यामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी अशा निष्काळजी घरमालकांवर थेट कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

भाडेकरार न करणे किंवा भाडेकरूची माहिती पोलिसांना न देणे हा कायदेशीर गुन्हा आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घरमालकांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६३ चे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. पुण्यात मागील काही दिवसांपासून या प्रकऱणात अनेकांना अटक कऱण्यात आले आहे. काहींना आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे.

गेल्या २ महिन्यांत १३० घरमालकांवर पोलिसांची धडक कारवाई

भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे न नोंदवणाऱ्या घरमालकांवर पुणे शहर पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. गेल्या दोन महिन्यांत (२१ जुलै ते २८ सप्टेंबर २०२६) पुण्यासह उपनगरांमध्ये विशेष मोहीम राबवून तब्बल १३० घरमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांपैकी १७ प्रकरणांमध्ये न्यायालयाने घरमालकांना दंडात्मक शिक्षा ठोठावली असून, दंड न भरल्यास साध्या कैदेची तरतूद करण्यात आली आहे.

२ महिन्यांतील कारवाईची एकत्रित आकडेवारी:

  • एकूण कारवाई झालेले घरमालक: १३०

  • पीजी (PG) चालक: ३५

  • हॉटेल मालक: १५

  • दाखल रिपोर्ट (NCP/FIR): २५३

  • न्यायालयाकडून निकाल लागलेली प्रकरणे: १७

Pune tenant verification online

घरमालकांनी घर भाड्याने देताना '५' गोष्टींची काळजी घ्यावी -

  • भाडेकरूचे अधिकृत ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड) तपासूनच कायदेशीर भाडेकरार करा.

  • भाडेकरूचा मूळ/कायमचा पत्ता आणि आपत्कालीन संपर्कासाठी क्रमांक नक्की घ्या.

  • सर्व कागदपत्रांची आवश्यक शहानिशा करा आणि करारातील माहिती अचूक असल्याची खात्री करा.

  • भाडेकरूची सर्व माहिती स्थानिक पोलिस ठाण्यात तात्काळ नोंदवा.

  • भाडेकरूबाबत काहीही संशयास्पद आढळल्यास लगेच पोलिसांना माहिती द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mosquitoes : डासांना पळवून लावण्यासाठी लिबांच्या सालीचा भन्नाट उपाय, एकदा नक्की करून पाहा

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

Chanakya Niti : नातेवाईकांना 'या' 7 गोष्टी सांगाल तर रस्त्यावर याल! चाणक्यांचा गंभीर इशारा

कल्याणमध्ये १८४ रहिवाशांची १७६ कोटींची फसवणूक? बड्या बिल्डरविरोधात खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल

Thane Picnic Spot: ठाण्यातील प्रसिद्ध 5 ठिकाणे, जी तुम्हाला माहित नाही

SCROLL FOR NEXT