Yerwada–Katraj Tunnel Project Saam
मुंबई/पुणे

पुणेकरांसाठी गुड न्यूज! येरवडा- कात्रज भुयारी मार्ग होणार तयार? वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Yerwada–Katraj Tunnel Project: येरवडा–कात्रज भुयारी मार्ग प्रकल्पाचा अहवाल दीड महिन्यात सादर होणार. तब्बल ७५०० कोटी खर्चाच्या या प्रकल्पावर पीएमआरडीएचा अभ्यास सुरू.

Bhagyashree Kamble

  • येरवडा–कात्रज भुयारी मार्ग प्रकल्पाचा अहवाल दीड महिन्यात सादर होणार.

  • तब्बल ७५०० कोटी खर्चाच्या या प्रकल्पावर पीएमआरडीएचा अभ्यास सुरू.

  • मोनार्क एजन्सी वाहतूक कोंडी आणि उपयुक्ततेचा शास्त्रीय अहवाल तयार करणार.

  • अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार.

पुणेकरांच्या गतीमान प्रवासासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून लवकरच भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग प्रकल्पाचे भवितव्य पुढील दीड महिन्यांत ठरणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ लेनच्या २ भुयारी मार्गांसाठी तब्बल ७,५०० कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कितपत कमी होणार, रस्त्यावरील गर्दी किती कमी होणार, याचा सध्या शास्त्रीय अभ्यास सुरू आहे.

भुयारी प्रकल्पासाठी पीएमआरडीएने मोनार्क एजन्सीची नेमणूक केलीआहे. ही एजन्सी पुढील दीड महिन्यांत आपला सविस्तर अहवाल सादर करणार असल्याची माहिती आहे. या अहवालावर आधारितच प्रकल्प राबवायचा की नाही, याचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

पुणेकरांच्या सोयीसाठी रिंगरोड, महामार्ग जोडणीसह विविध प्रकल्प सुरू आहेत.यामध्ये सर्वात महत्वाचा प्रकल्प म्हणून येरवडा - कात्रज भुयारी मार्गाला गती देण्यात आली आहे. हा प्रकल्प पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांच्या पुढाकाराने सुरू झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.

वाहतुकीवर अभ्यास सुरू

या प्रकल्पाचा प्रचंड खर्च लक्षात घेत, त्याची उपयुक्तता तपासणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी संबंधित मार्गावर दररोज किती वाहने धावतात, कोणत्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते? तसेच भुयारी मार्ग तयार झाल्यास किती प्रमाणात गर्दी कमी होईल, याचा सध्या अभ्यास सुरू आहे. पीएमआरडीने निविदा प्रक्रियेनंतर हे काम पुण्यातील मोनार्क एजन्सीला हे काम सोपवलं आहे.

येरवडा ते कात्रज भुयारी मार्गाची उपयुक्तता तपासण्यासाठी मोनार्क एजन्सी ३ महिने अभ्यास करणार आहे. दीड महिन्यांपासून या मार्गावर प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरूये. उर्वरित दीड महिन्यात अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे. हा अहवाल आल्यानंतरच भुयारी मार्गाचा प्रकल्प राबवायचा की नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How to Reduce Cholesterol: फक्त 7 दिवसांत कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? मग आहारात लगेच करा हे 4 बदल

मनसेच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: राज ठाकरे 28 आणि 29 या दोन दिवसाच्या कल्याण- डोंबिवली दौऱ्यावर

Famous Actor Death : चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुर्दैवी घटना! प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Shengdana Chutney Recipe : हिवाळ्यात गरमागरम भाकरीसोबत हवीच शेंगदाण्याची चमचमीत चटणी, वाचा अस्सल पारंपरिक रेसिपी

SCROLL FOR NEXT