Punes Sinhagad Missing Youth Saam TV News
मुंबई/पुणे

सिंहगडावरून खाली कोसळला, CCTVच्या मदतीनं गायकवाडला शोधलं, ५ दिवस नेमका कुठे होता? पोलिसांना वेगळाच संशय

Punes Sinhagad Missing Youth: सिंहगडावरून पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला गौतम गायकवाड अखेर सापडला. पुणे ग्रामीण पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं मोठं शोधकार्य केलं.

Bhagyashree Kamble

  • सिंहगडावरून पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला गौतम गायकवाड अखेर सापडला.

  • पुणे ग्रामीण पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं मोठं शोधकार्य केलं.

  • सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो पळताना व लपताना दिसल्याने पोलिसांना संशय.

  • अपघात की घातपात, याबाबत सध्या तपास सुरू असून सत्य लवकरच उघड होणार.

पुण्यातील सिंहगड गडावरून पाच दिवसांपूर्वी एक तरूण बेपत्ता झाला होता. तानाजी कड्यावरून दरीत कोसळला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे सर्च ऑपरेशन करत तरूणाला शोधण्याचा प्रयत्न केला. तब्बल पाच दिवसांच्या शोधकार्यानंतर पोलिसांना तरूण सापडला. पुणे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे गौतमला शोधलं. मात्र, पोलिसांना वेगळाच संशय आहे.

पाच दिवसानंतर गौतम सापडला

२४ वर्षीय गौतम गायकवाड हा साताऱ्यातील रहिवासी आहे. तो मित्रांसोबत सिंहगडावर फिरायला गेला होता. सिंहगडावर जात असताना तानाजी कड्यावरून तरूणाचा पाय घसरला. तसंच तो खाली कोसळला. मित्र दरीत पडला असल्याचं कळताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मित्र दरीत पडला असल्याची माहिती दिली.

माहिती मिळताच पुणे ग्रामिण पोलीस, हवेली पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं शोधकार्यास सुरूवात केली. पण तरी शोधून गौतम गायकवाड सापडला नाही. पाच दिवसानंतर गौतम सापडला. त्याला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तरूणावर प्राथमिक उपचार सुरू आहे.

गौतमचा शोध पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केला. सिंहगडाच्या पायथ्याशी सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी गौतमचा शोध घेतला. या कॅमेऱ्यात तो पळताना आणि लपताना कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांना संशय आलाआहे. त्यानं जाणूनबुजून केला आहे का? अपघात की घातपात? असा संशय पोलिसांना येत आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, त्याच्या जबाबानंतर हे प्रकरण अधिक उघड होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गणरायाच्या आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यात "ड्राय डे" घोषित

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढाच्या घरी येणार नवा पाहुणा; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

Accident News : लातूरमध्ये कारची दुचाकीला जोरात धडक, ३ तरूणांचा जागीच मृत्यू

Bindusara Dam : बीडकरांची चिंता मिटली; मुसळधार पावसात बिंदुसरा धरण ओव्हर फ्लो

ठाकरेंचा भाजपाला धक्का; रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत महिला नेत्यानं हाती घेतली मशाल

SCROLL FOR NEXT