PM Modi visit to Pune: पुणेकरांनी शहरभर लावले खोचक टोमणे मारणारे बॅनर...(पहा व्हिडिओ) Saam Tv
मुंबई/पुणे

PM Modi visit to Pune: पुणेकरांनी शहरभर लावले खोचक टोमणे मारणारे बॅनर...(पहा व्हिडिओ)

आज पुणे (Pune) मेट्रोच्या वनाझ ते गरवारे या टप्प्याचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज पुणे (Pune) मेट्रोच्या वनाझ ते गरवारे या टप्प्याचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्याच बरोबर नदीसुधार प्रकल्पाचीही सुरुवात पंतप्रधानांच्या हस्ते केली जाणार आहे. साधारण सकाळी १० च्या सुमारास मोदींचे (Narendra Modi) पुण्यात आगमन होणार आहे. सत्ताधारी भाजपकडून (BJP) आणि शिवसेना तसेच राष्ट्रवादींकडून (Shivsena) मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करत असल्याचे दिसून आले आहे. यावेळी पुणेकरांनी शहरभर खोचक टोमणे मारणारे बॅनर लावले आहेत. (Punekar put up banners all over the city)

पहा व्हिडिओ-

शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुभेच्छांचे बॅनरही लावण्यात आले आहेत. त्यानंतर ते पुणे महापालिकेतील (Municipal Corporation) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण करतील. त्यानंतर गरवारे इथं मेट्रोचं (Metro) उद्घाटन करतील. तिथून ते मेट्रोने प्रवास करतील. त्यानंतर एमआयटीजवळ भाजपकडून (BJP) सभा होणार आहे. त्यानंतर मोदी आर के लक्ष्मण गॅलरीचं उद्घाटन करुन सिम्बॅायसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

दरम्यान मोदींच्या दौऱ्या आधीच पुण्यातलं राजकारण तापलंय. अर्धवट प्रकल्पाचं उद्घाटन मोदी करत असल्याची टिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. दरम्यान मोदींच्या दौऱ्या आधीच पुण्यातलं राजकारण तापलं आहे. अर्धवट प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान मोदी करत असल्याची टिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तर आज मोदींचा निषेध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आंदोलन करुन काळे झेंडे दाखवणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

बाबोsss ! २० हजाराला कोथिंबीर जुडी, ४१ हजाराला एक नारळ, पाहा VIDEO

Gautami Patil New Song: सबसे कातील गौतमी पाटीलचं “राणी एक नंबर” गाणं प्रदर्शित

SCROLL FOR NEXT