PM Modi visit to Pune: पुण्यात मोदींच्या स्वागताला सेनेचे बॅनर...(पहा Video)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.
PM Modi visit to Pune: पुण्यात मोदींच्या स्वागताला सेनेचे बॅनर...(पहा Video)
PM Modi visit to Pune: पुण्यात मोदींच्या स्वागताला सेनेचे बॅनर...(पहा Video) प्राची कुलकर्णी
Published On

प्राची कुलकर्णी

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज पुणे (Pune) मेट्रोच्या वनाझ ते गरवारे या टप्प्याचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्याच बरोबर नदीसुधार प्रकल्पाचीही सुरुवात पंतप्रधानांच्या हस्ते केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी चक्क शिवसेनेनेच होर्डींग लावले आहेत. शिवसेना नेते आणि माजी शहरप्रमुख श्याम देशपांडे यांच्याकडून मोदींच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी मोदींविरोधात आंदोलन करत असताना सेनेकडून स्वागत होत असल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे.

पहा व्हिडिओ-

साधारण सकाळी १० च्या सुमारास मोदींचे (Narendra Modi) पुण्यात आगमन होणार आहे. सत्ताधारी भाजपकडून (BJP) आणि शिवसेनेकडून (Shivsena) मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुभेच्छांचे बॅनरही लावण्यात आले आहेत. त्यानंतर ते पुणे महापालिकेतील (Municipal Corporation) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण करतील. त्यानंतर गरवारे इथं मेट्रोचं (Metro) उद्घाटन करतील.

PM Modi visit to Pune: पुण्यात मोदींच्या स्वागताला सेनेचे बॅनर...(पहा Video)
PM Modi visit to Pune: पुणेकरांनी शहरभर लावले खोचक टोमणे मारणारे बॅनर...(पहा व्हिडिओ)

त्यानंतर एमआयटीजवळ भाजपकडून (BJP) सभा होणार आहे. त्यानंतर मोदी आर के लक्ष्मण गॅलरीचं उद्घाटन करुन सिम्बॅायसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. दरम्यान मोदींच्या दौऱ्या आधीच पुण्यातलं राजकारण तापलंय. अर्धवट प्रकल्पाचं उद्घाटन मोदी करत असल्याची टिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. दरम्यान मोदींच्या दौऱ्या आधीच पुण्यातलं राजकारण तापलं आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com