Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता आरक्षण सोडतीची तारीख ठरली, कधी आणि कुठे होणार कार्यक्रम?

Pune News : पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदांसाठी १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत पार पडणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बहुउद्देशीय सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

Alisha Khedekar

  • जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत येत्या १३ ऑक्टोबरला होणार आहे

  • जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे

  • ७३ सदस्य पदांसाठी आरक्षण सोडत पार पडेल

  • तालुकानिहाय पंचायत समित्यांमध्येही आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील ७३ सदस्य पदाकरिता आरक्षण सोडत १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता, बहुउद्देशीय सभागृह, ५ वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. तसेच याच दिवशी पंचायत समिती सदस्य पदांकरिता आरक्षण सोडतीचे संबंधित तालुक्यात आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम २०२५ नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. याकरिता सोडत कार्यक्रमाचे १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता तालुकानिहाय आयोजन करण्यात आले आहे.

जुन्नर, आंबेगाव, खेड, मुळशी, वेल्हे आणि पुरंदर पंचायत समितीचे आरक्षण सोडत संबंधित पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तर शिरूर पंचायत समितीची सोडत नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, शिरूर, मावळ पंचायत समिती - भेगडे लॉन्स, वडगांव मावळ, ता.मावळ, हवेली - उद्यान प्रसाद कार्यालय, १७१२/१ बी, सी व्ही जोशी मार्ग, खजिना विहीर चौक, माडीवाले कॉलनी, सदाशिव पेठ, दौंड पंचायत समिती - बैठक सभागृह, दुसरा मजला, नविन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, दौंड, भोर - अभिजीत मंगल कार्यालय, भोर महाड रस्ता, भोर आयोजित करण्यात आली आहे.

बारामती पंचायत समिती- कवी मोरोपंत सभागृह, इंदापूर रस्ता, बारामती आणि इंदापूर पंचायत समितीची आरक्षण सोडत राधिका रेसिडेन्सी क्लब, इंदापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ.चारुशीला देशमुख-मोहिते यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI चा मोठा निर्णय! कार, स्मार्टवॉच अन् टीव्हीद्वारे करता येणार UPI पेमेंट

Maharashtra Politics : शिंदे गटाला मोठा झटका, मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update: राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल

Khare Shankarpali Recipe : यंदा दिवाळीला खास बनवा खुसखुशीत खारी शंकरपाळी, फक्त १० मिनिटांत रेसिपी तयार

Crime News : मामाच्या मुलीचा लग्नाला नकार, तरुण कमालीचा संतापला, चवताळलेल्या भावानं बाजारपेठेतच रक्तरंजित खेळ केला

SCROLL FOR NEXT