Pune Zika Virus Update Saam Digital
मुंबई/पुणे

VIDEO : पुण्यात वाढला 'झिका'चा धोका! चौथा रुग्ण आढळल्यानं खळबळ; टेन्शन नको, अशी घ्या काळजी!

Zika Virus Patient Found in Pune: पुणे शहरात झिका व्हायरचा चौथा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे महानगरपालिकेने नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

Sandeep Gawade

कोरोना महामारीतून आता कुठे जग सावरलं आहे. मात्र पुण्यात सापडलेल्या झिका व्हायरसने राज्यासर देशाचं टेन्शन वाढवलं आहे. पुण्यात आज चौथा रुग्ण आढळला आहे. झिकाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष ठेवलं जात आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता सांगडे यांनी दिली.

ज्या भागात चार रुग्ण सापडले आहेत त्या भागात सर्वेक्षण सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये. रक्त नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले आहेत. त्याच्या अहवालांची प्रतिक्षा आहे, मात्र नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, उपचार वेळेत घेतले तर झिका बरा होऊ शकतो. खासगी रुग्णालयांनीही माहिती लपवू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

पुण्यात आढळलेल्या झिकाच्या ४ रुग्णांच्या संपर्कामध्ये आलेल्या सर्व नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे हे ३ रुग्ण ज्या परिसरामध्ये आढळले होते त्या एरंडवणा आणि मुंढवा परिसरातील २ हजार ४०० हून अधिक घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या परिसरामधील नागरिकांना झिका व्हायरसची लक्षणे आहेत की नाही याची तपासणी केली जात आहे. खासगी रुग्णालयांमध्ये झिकाची लक्षणे असलेले रुग्ण आढळले तर त्यांनी याची माहिती न लपवता महापालिकेला कळवावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

झिकाचा व्हायरस एडिस जातीच्या डासांपासून पसरतो. याची लागन झाली तर ताप येणे. अंगावर पुरळ येणे. अशक्तपणा, सांधेदुखी, अंगदुखी, डोळे लाल होणे अशी लक्षणे आढळतात. त्यामुळे नागरिकांना घराच्या अवतीभोवती पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, डासांपासून संरक्षण करण्यासाठी मच्छरदानी आणि औषधांचा वापर करावा, पूर्ण अंग झाकतील असे कपडे घालावेत. गरोदर महिलांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण झिकाची लागण झाली तर प्रिमॅच्युअर डिलिव्हरी आणि जन्मजात दोष निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र हा हाजार जिवघेणा नाही, योग्य काळजी घेतली तर संभाव्य धोका टाळता येऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT