Yogesh Kadam Interview Saam Tv
मुंबई/पुणे

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Yogesh Kadam Interview : राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी साम टीव्हीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि त्यावर सरकारकडून सुरु असलेले उपाय याबाबतची माहिती दिली.

Yash Shirke

महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी साम टीव्हीला मुलाखत देण्यासाठी आले होते. मुलाखतीदरम्यान योगेश कदम यांनी कायद्याची अंमलबजावणी, पोलीस यंत्रणांचे कामकाज, गुन्हेगारीवर नियंत्रण, आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था अशी विविध मुद्यांवर प्रतिक्रिया दिल्या. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या प्रश्नावर त्यांनी सरकारची बाजू मांडली.

'पुण्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. कोयता गँग असेल, अन्य कोणत्या गँग असतील अगदी दिवसाढवळ्या चोरीच्या घटना घडत आहेत. परवा ५० लाख लुटल्याची घटना घडली. पुणे सारखं सांस्कृतिक शहर जर क्राईम कॅपिटल बनत चाललं असेल, तर ही गंभीर बाब आहे' असे म्हणत योगेश कदम यांना पुण्यातील गुन्हेगारीवर प्रश्न विचारण्यात आले.

'मी स्वत: पुण्याचे दोनदा दौरे केले आहेत. गुन्हेगारीच्या प्रश्नावरुन मी पोलीस आयुक्तांना भेटलो आहे, गुन्हेगारी वाढण्यामागील नेमकी कारण काय आहे यावर त्यांच्याशी चर्चा केली आहे. एक लक्षात येत की, पुण्यात गुन्हेगारीचा शिरकाव ग्रामीण भागातून होत आहे. पुणे शहरात गुन्हेगार, गँगस्टर्स राहत नाहीत. जे कुणी गुन्हेगार आहेत, ते ग्रामीण भागातून पुण्यात येत आहेत. यामध्ये लहान मुलांचा जास्त समावेश आहे. काही गँगस्टर्स हे लहान मुलांकडून गुन्हे करवून घेतात. आपण लहान मुलांना अटक करु शकत नाही, त्यांना बालसुधारगृहामध्ये पाठवावं लागतं. याचा फायदा काही गुन्हेगार करत आहेत. अशा गोष्टी लक्षात आल्या आहेत. ड्रग्सची समस्या संपूर्ण जगात आहे. फक्त आपल्या महाराष्ट्रात आहे असं नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ड्रग्सशी संबंधित काम करणारी एक टीम असणार आहे असा निर्णय घेण्यात आला आहे,' असे वक्तव्य योगेश कदम यांनी केले आहे.

मुलाखतीमध्ये गृह राज्यमंत्र्यांनी पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठीचा सरकारचा प्लान सांगितला. ते म्हणाले, 'कोयता गँग पुण्यात अॅक्टिव्ह नाहीये. लहान मुलांकडून गुन्हेगार दमदाटी करत असतात. लहान मुलांकडून तोडफोड करवून घेणं, गुन्हे घडवून घेणं हे एकाच गँगकडून होतंय असं नाही. लहान मुलांच्या हातात कोयता द्यायचा, जा रे तिकडे जाऊन दुकानं फोडून ये म्हणायचं. मुलांना २००-३०० रुपये दिले की ते दुकान फोडून येतात अशा घटना घडू नये यासाठी पोलीस स्थानकांची संख्या वाढतोय पुण्यात पोलिसांचे संख्याबळही वाढवत आहोत, सीसीटीव्ही फुटेज वाढवले जात आहेत गुन्हेगारीला रोखण्यासाठी सर्वपरी प्रयत्न केले जात आहेत. भविष्यात १०० टक्के पुण्यातील गुन्हेगारी कमी झाल्याचे पाहायला मिळेल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्यदिनी जळगाव शहरात प्रथमच मांसविक्रीवर बंदी !

Tirgrahi Yog: 50 वर्षांनंतर बनणाऱ्या त्रिग्रही योगामुळे 'या' राशींचे येणार अच्छे दिन; तीन ग्रहांमुळे मिळणार

Mental Health : रील्स स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे मेंदूवर होणारे पाच घातक परिणाम

Karuna Munde : धनंजय मुंडेंचे मुंबईत ३ फ्लॅट, पण मुक्काम मात्र सरकारी बंगल्यावर, करूणा मुंडे अन् अंजली दमानियांचा गंभीर आरोप

ध्वाजारोहणास छगन भुजबळांचा नकार, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, महायुतीत नेमकं काय सुरू?

SCROLL FOR NEXT