Pune Crime  google
मुंबई/पुणे

Pune Crime : ऑफिसचा वाद, पार्किंगमध्ये तरुणीचा घात; चॉपरच्या हल्ल्यात IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

man killed woman in pune : पुण्यात पार्किंगमध्ये तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. कंपनीतल सहकाऱ्याने केलेल्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला आहे. शुभदा कोदारे असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : पुण्यातून महिलेच्या हत्येची खळबळ घटना घडली आहे. पुण्यातील येरवडा भागातील एका कंपनीच्या महिलेवर जीवघेणा हल्ला झाला. कंपनीमधील सहकाऱ्यानेच महिलेवर चॉपरने वार केले. धारदार शस्त्राच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पुण्यात येरवडा भागात असणाऱ्या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचा जीवघेणा हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुभदा कोदारे असे महिलेचे नाव आहे. हल्ल्यानंतर रक्तस्त्राव झाल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहिती हाती आली आहे. पुण्यातील आयटी कंपनीमध्ये अकांऊट म्हणून ही महिला कार्यरत होती.

आज मंगळवारी सायंकाळी कंपनीच्या पार्किंगमध्ये तिच्याच सहकाऱ्याने तिच्या हाताच्या कोपऱ्यावर वार केले. या हल्ल्यात शुभदा कोदारे ही महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कृष्णा कनोजा याला अटक केली आहे.

पार्किंगमध्ये नेमकं काय घडलं?

दोघेही एकमेकांच्या ओळखीचे होते. आर्थिक वादातून हे सगळं प्रकरण घडल्याची माहिती हाती आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात पैशांची देवाण घेवाण झाली होती. आज संध्याकाळी शुभदा कोदारे तिचे काम संपवून पार्किंगमध्ये असलेल्या गाडीतून घरी जात होती.

याच वेळी कृष्णा तिथे आला आणि त्याच्या हातात भाजी कापण्यासाठी वापरलेले चॉपर होता. त्याने शुभदा हिला अडवले. त्यानंतर तिच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर हल्ला केला. हा घाव इतका गंभीर होता की, शुभदा तिथेच कोसळली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्यात तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

SCROLL FOR NEXT