Cars vandalized in Pune  Saam tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात कोयता घेऊन टोळक्यांकडून गाड्यांची तोडफोड, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Cars vandalized in Pune : पुण्यात कोयता घेऊन टोळक्यांकडून गाड्यांची तोडफोड, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

साम टिव्ही ब्युरो

Pune Latest Crime News : पुण्यातील येरवड्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. आता पुन्हा टोळक्यांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

पूर्व वैमान्यातून गाड्यांची तोडफोड केल्याचे सांगण्यात येत आहे. ही संपूर्ण तोडफोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या तोडफोडीत दोन कारचे मोठे नुकसान झाले आहे. या टोळक्यांनी दोन्ही गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी सुभाष राठोड, अनिल उर्फ पोपट वाल्हेकर या दोघांची चव्हाण गँगनी हत्या केली होती. त्यातील तीन आरोपीची नुकतीच जामीनावर सुटका झाली होती. त्या रागातून खून झालेल्या राठोड गटातील तरुणांनी दहशत माजवण्यासाठी गाड्या फोडल्या, असं सांगण्यात येत आहे.  पोलीस (police)  ]या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Pune)

Pune News: पुण्यात कोयता घेऊन तरुणांची दहशत

तत्पूर्वी पुण्यातील उत्तमनगर परिसरातही अशीच एक घटना घडली होती. येथे वाढदिवसाला टोळक्याकडून कोयते फिरवत तसेच दगडफेक केल्याची घटना समोर आली होती. येथे भर रस्त्यात टोळक्याकडून वाढदिवस साजरा करण्यात येत होता. यावेळी किरकोळ कारणावरुन त्यांच्यात वाद झाले. यावेळी टोळक्याने परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करत गाड्यांची तोडफोड केली.

या प्रकरणी सचिन दिलीप राठोड(२४) याला अटक करण्यात आली होती. तसेच त्याचे साथीदार शुभम संदीप ठाकूर सोन्या खाडे, अक्षय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी या गुंडांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: प्रोफेसरकडून शरीरसंबंधासाठी जबरदस्ती, विद्यार्थिनीने कॉलेजमध्येच पेटवून घेतलं; घटना CCTV मध्ये कैद

Maharashtra Tourism: खंडाळा, महाबळेश्वर विसराल, महाराष्ट्रातील 'या' सुंदर ठिकाणी एकदा तरी भेट द्याच

Beed News: बीड पुन्हा चर्चेत; बजरंग सोनवणे यांच्या समर्थकांचा हॉटेलमध्ये बंदुकीसह फोटो|VIDEO

Maharashtra Live News Update : -पुण्यात लक्ष्मीबाई स्मृती पुरस्काराच आयोजन

Liquor Ban : ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव; तरीही गावात खुलेआम दारू विक्री, महिला आक्रमक

SCROLL FOR NEXT