Yerwada jail  Saam tv
मुंबई/पुणे

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

Yerwada jail news : येरवडा कारागृहात आरोपींमध्ये हाणामारीची घटना घडली. या हामाणारीत एका आरोपीचा मृत्यू झाला.

Akshay Badve

पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी

जीवघेणा हल्ल्यात जखमी झालेल्या आरोपीचा मृत्यू

हाणामारीच्या घटनेनंतर कारागृहातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

पुण्यातील येरवडा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पुण्यातील येरवडा कारागृहातून सुटल्यानंतर गुन्हेगारांनी रॅली किंवा 'रोड शो' केल्याचे अनेकदा समोर आलं आहे. आता कारागृहातच हाणामारीत होऊन आरोपीचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. आरोपीच्या मृत्यूने कैद्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

पुण्यातील कारागृहात १५ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता आरोपींमध्ये हाणामारीची घटना घडली. कारागृहातील बराक क्रमांकमध्ये एका आरोपीला जोरदार मारहाण झाली. कारागृहातील कैद्यांनी आरोपीवर जीवघेणा हल्ला केला. त्याच्या कंबर आणि डोक्यात फरशी घातली. या हाणामारीत आरोपीचा मृत्यू झाला. आरोपीच्या मृत्यूने संपूर्ण येरवडा कारागृहात खळबळ उडाली आहे. विशाल कांबळे अस मृत पावलेल्या आरोपीचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

कारागृहातील कैद्यांनी विशालच्या डोके आणि कमरेवर फरशीने वार केले. कारागृहातील आकाश चंडालिया आणि दीपक रेड्डी याने विशालवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विशालला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केलेल्या विशालचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी विशालच्या मृत्यूने येरवडा कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बीडमधील कारागृहात कराड गँगची पोलिसावर दादागिरी

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांच्या टोळक्याचा माज सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी या टोळक्यांनी बीड जिल्ह्यातील कारागृहातील एका कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली. बाबा कवठे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहेच. या प्रकारानंतर बीडमध्ये कराड गँगची कारागृहातही दादागिरी सुरु असल्याची आरोप होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Titwala : कोहळा, टाचण्या टोचलेलं लिंबू अन् कोंबडीचे पाय...; भाडेकरूच्या घराबाहेर जादूटोणा, टिटवाळ्यातील भयंकर प्रकार

Maharashtra News Live Update: अंबरनाथ पालिकेत ३७ कामांचे टेंडर बिलो रेटने ओपन!

Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये तुंबळ हाणामारी, धारदार शस्त्राने तिघांवर हल्ला; दोघांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?

Famous Actress : 'बिग बॉस' शोचे आमिष दाखवून प्रसिद्ध अभिनेत्रीला ११ लाखांचा गंडा, मुंबईत तिघांविरुद्ध गुन्हा

Lionel Messi: इंग्लंड जिंकणार वाटत असतानाच मेस्सीने फिरवली जादूची कांडी; अवघ्या 7 मिनिटांत मिळवलं फायनलचं तिकीट, वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT