Pune Building Collapse Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: इमारतीचा स्लॅब कोसळून 5 कामगारांचा मृत्यू, 5 जखमी

काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला आहे. त्यामुळे ही दुर्घटना घडली.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे - पुण्यात गुरुवारी रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली आहे. येरवडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून (Slab Collapse) ५ मजुरांचा मृत्यू झाला, तर ५ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जवळपास दहा कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. येरवडा येथील शास्त्री वाडीया बंगल्याजवळ हा अपघात झाला. स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस (Police) आणि अग्निशमन दलाचे (Fire Brigade)अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. (Yerawada Building Collapse Latest Update)

हे देखील पहा -

स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना हा अपघात झाला. स्लॅबच्या ढिगारा खाली आणि सळयांमध्ये अडकलेल्या कामगारांना पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून बाहेर काढण्यात आले. काही कामगार या सळयांमध्ये अडकल्याने सळया कापून त्यांना बाहेर काढल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला आहे. त्यामुळे ही दुर्घटना घडली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या चार ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांची ओळख अद्याप पटलेली नाही. हे सर्वजण बिहारमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी खबरदारी न घेतल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान, मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात येत आहेत. तर जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

Phone Charging: फोन चार्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा आग लागू शकते

Maharashtra Politics : ठाकरेंना रोखण्यासाठी फिल्डिंग? एकनाथ शिंदेंचा अमित शाहांपुढे सीएमपदाचा प्रस्ताव?

SCROLL FOR NEXT