Pune Rainfall Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Rain: पहिल्याच पावसात पुणे तुंबले! वाघोलीतील रस्त्यांवर गुडघाभर पाणी; वाहनं पाण्यात अडकली; पाहा VIDEO

Pune Rainfall Video: पुण्यात पावसाने हाहाकार केला असून या पावसामुळे पुण्यातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अचानक आलेल्या या पावसामुळे पुणेकरांचे चांगलेच हाल झाले.

Priya More
  • वाघोलीत मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय

  • पुण्यात पहिल्याच पावसात वाहतुकीचा खोळंबा

  • पाण्यात अडकली वाहने

  • पुणे महापालिकेच्या कामकाजावर नागरिक नाराज

अक्षय बडवे, पुणे

पुण्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. वादळी वाऱ्यासह अचानक जोरदार पावसाने पुण्यात हजेरी लावली. या पावसाने वाघोली परिसराला आज चांगलंच झोडपून काढले. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे वाघोलीतील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. पुण्यातील सर्वच भागामध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांचा चांगलीच तारंबळ उडाली.

मुख्य रस्ते, चौक तसेच अंतर्गत भागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढत वाहने चालवावी लागली. अनेक दुचाकी बंद पडल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. काही ठिकाणी वाहतूकही संथ गतीने सुरू होती.

स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि पाणी निचऱ्याची कामे व्यवस्थित न झाल्याने दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र पावसाच्या पहिल्याच जोरदार सरीत वाघोलीतील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

हवामान खात्याकडून पुणे शहराला आज येलो अलर्ट देण्यात आला होता. दुपारनंतर शहरात ढगाळ वातावरण आणि विजेचा गडगडाट सुरू झाला. त्यानंतर पावसाने जोर पकडला. पुणे शहरातील सर्वच परिराला पावसाने झोडपून काढले. पुढील २ दिवस पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांचे वैभववाडीतील हेत या गावी उभारणार स्मारक

Railway News : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर रेल्वेचं तिकीट महागणार

Reservation: 'हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारल्यास आरक्षणाचा लाभ मिळणार नाही', सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Weight Loss Tips: वजन कमी करणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती, चालताना या 6 गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या

Heart blockage: ब्लड प्रेशर नॉर्मल असलं तरी हृदयात ब्लॉकेज असू शकतात? या 6 टेस्ट सांगतील हार्ट अटॅकचा धोका!

SCROLL FOR NEXT