Pune Water Supply Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Water Supply: पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार; बुधवारी 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Water Cut News: पुणे शहरातील काही भागात येत्या बुधवारी (६ मार्च) आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलंय.

Satish Daud

Pune Water Supply News Today in Marathi

पुणे शहरातील काही भागात येत्या बुधवारी (६ मार्च) आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा तसेच वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहेत. सध्या शहरातील विविध भागात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे देखभाल तसेच दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यातील बहुतांश कामे बुधवारी केली जाणार आहे. त्यामुळे शहरातील कोंढवा, स्वारगेट हडपसर, कात्रज या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी (७ मार्च) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा (Water Supply) होणार आहे. त्यामुळे पुणेकरांची तारांबळ होण्याची शक्यता आहे.

कोणकोणत्या भागातील पाणीपुरवठा बंद?

पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या बुधवारी पुण्यातील कोंढवा बुद्रुक, अप्पर इंदिरानगर, साईनगर, गजानन नगर, काकडे वस्ती, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर, सुप्पर इंदिरानगरचा काही भागातील पाणीपुरवठा बंद राहिल. (Latest Marathi News)

त्याचबरोबर इस्कॉन मंदिर परिसर, कोंढवा बुद्रुक गाव, लक्ष्मीनगर, अजमेरा पार्क, अश्रफनगर, शांतीनगर, माळवे गार्डन परिसर, श्रेयसननगर, अंबिकानगर, पवननगर, तुळजाभवानी नगर, सरगमनगर, गोकुळनगर, सोमनाथनगर, शिवशंभोनगर, गुलमोहर कॉलनी, अण्णाभाऊ साठे नगर, अप्पर डेपो, महानंदा सोसायटी परिसर, गुरूकृपा कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, या भागातही पाणीपुरवठा होणार नाही.

श्रीकुंजनगर, पुण्याईनगर, बालाजी नगर, शंकर महाराज मठ परिसर, अप्पर आणि लोअर इंदिरानगर, महेश सोसायटी परिसर, मानस सोसायटी परिसर, पद्मकुंज परिसर, राजयोग सोसायटी परिसर, लोकेश सोसायटी, विश्वशंकर सोसायटी, कुंभार वस्ती, दामोदरनगर, यासह चिंतामणीनगर भाग एक आणि दोन या भागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT