Pune Water Supply Cut News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! १५ टक्के पाणीकपात होणार, धरणांमधील पाणीसाठ्यात घट

Pune Water Supply Cut News : पुण्यात कमी पावसाच्या अंदाजामुळे पाणीटंचाईचा धोका वाढला असून खडकवासला धरणातील पाणीसाठा टिकवण्यासाठी १५% पाणी कपातीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Akshay Badve

  • पुण्यात पाणीटंचाईचा धोका वाढला

  • खडकवासला धरणातील साठा चिंतेत

  • १५% पाणी कपातीची शक्यता

  • प्रशासनाकडून पाणी बचतीचे आवाहन

काही दिवसांपूर्वी पुण्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झालं होतं यंदा पाऊस लवकर आला की काय अशा प्रतिक्रिया सुद्धा आणि पुणेकरांनी व्यक्त केल्या होत्या. असं असलं तरी सुद्धा काही हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून फार काळ नसल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम पाण्याच्या वापरावर होणार असल्यामुळे एप्रिल महिन्यातून जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला पत्र पाठवले आहे.

या पत्रामध्ये पाणी जपून वापरावे तसेच खडकवासला धरणातील पाणीसाठा 31 ऑगस्ट पर्यंत शिल्लक राहील याचं नियोजन करण्याची आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे. तसंच पुणे शहरात १५ टक्के पाणी कपातीची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

हवामान विभागाने यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवल्याने, तसेच खडकवासला प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत पुरविण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जलसंपदा विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह एमआयडीसीला दरमहा १५ टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश दिले आहेत.

पाणी कपात न केल्यास भविष्यात निर्माण होणाऱ्या टंचाईला सर्वस्वी संबंधित संस्था जबाबदार राहतील असं स्पष्ट मत जलसंपदा विभागाने महापालिकेला लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे. त्यामुळे एका बाजूला पुणेकरांना तीव्र उन्हाच्या जाळा या सहन कराव्या लागणार आहेतच सोबतच पाणीटंचाईला देखील सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT