Pune Water Supply
Pune Water Supply Saam TV
मुंबई/पुणे

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, 'या' भागात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद

Priya More

Pune News: पाण्याचा अतिवापर करणाऱ्या पुणेकरांसाठी (Punekar) ही बातमी खूपच महत्वाची आहे. येत्या गुरुवारी पुण्याच्या अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा बंद (Water Cut) राहणार आहे. पुण्याच्या सिंहगड रस्ता, कात्रज परिसरामध्ये गुरूवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पुणे महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे.

विद्युत वाहिनीचे होणार काम -

मिळालेल्या माहितीनुसार, महावितरण कंपनीकडून 22 केव्ही वहन क्षमता असणाऱ्या विद्युत वाहिनीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे गुरुवारी वडगाव जलकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या भागांचा पाणी पुरवठा सकाळी 9 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या काळात बंद असणार आहे. सायंकाळी 5 वाजल्यानंतर कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू होईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

या भागातील पाणी पुरवठा राहणार बंद -

हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज - भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, येवलेवाडी, सहकारनगर भाग 2, आंबेडकरनगर, टिळेकरनगर, दाते बस स्टॉप परिसर.

पाण्याचा जपून करा वापर -

या भागातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्यामुळे नागरिकांनी बुधवारीच अतिरिक्त पाणी साठवून ठेवावे. जेणे करुन त्यांना पाणी पुरवठा खंडीत झाल्यानंतर कोणतीही अचडण येणार नाही. गुरुवारी सायंकाळी 5 वाजल्यानंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत होणार आहे याची नोंद नागरिकांनी घ्यावी.

बाणेरचा पाणी प्रश्न सुटणार -

दरम्यान, समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बाणेर-बालेवाडी भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. येत्या 17 मे रोजी योजनेचे पहिल्या टप्प्यातील पूर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिले. महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली समान पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत. तसेच पाणी मोजणीसाठी मीटर लावावे, अशा सूचना पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar APMC Market: मिरचीची ठसका! नंदुरबार बाजार समितीत विक्रमी आवक; ३५० कोटींची उलाढाल

Today's Marathi News Live : पती यशवंत यांनी ४३ वर्षे शिवसेनेला दिली, त्यांची पुण्याई माझ्यापाठी - यामिनी जाधव

Harry Potter Castle Viral Video : रशियाच्या हल्ल्यात हॅरी पॉटरचा राजवाडा जळून खाक, घटनेचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर

Sushma Andhare: मोठी बातमी! सुषमा अंधारेंना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश

Pankaja Munde News: मुस्लिमांच्या केसालाही धक्का लागणार नाही, ही माझी गॅरंटी; पंकजा मुंडे कडाडल्या

SCROLL FOR NEXT