Pune: क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याचे सांगत वॉचमनला जबर मारहाण Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याचे सांगत वॉचमनला जबर मारहाण

सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

सागर आव्हाड

धायरी :- सिंहगड रस्ता परिसरातील सोसायटीच्या वॉचमनला क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याचे सांगत सहा ते सात जणांनी जबर मारहाण केली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमार घडली आहे. तसेच हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

हे देखील पहा-

काय घडलं त्या रात्री;

वॉचमन पांडुरंग चव्हाण हा घरात झोपला होता. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चौकशी करण्याच्या उद्देशाने क्राईम ब्रँच पोलीस Crime Branch Police असल्याचे सांगत सहा-सात जणांनी त्याला उठवले. आणि आरोपी जाधव येथे कोठे राहतो, त्याच्याकडे इनोव्हा Inova गाडी आहे असे विचारले. या प्रश्नांवर त्यावेळी पांडुरंग चव्हाण याने याबाबत काही माहिती नाही असे म्हणला. तसेच याबद्दल सोसायटीच्या चेअरमनला फोन करून विचारतो असे म्हंटला. तेव्हा तो वॉचमन त्यावेळेस आरोपी जाधव यालाच फोन लावत आहे असे म्हणत त्याला जबर मारहाण व शिवीगाळ केली. तसेच वॉचमनच्या पत्नी व मुलांनाही धमकावले. नीट राहा नाहीतर सगळ्यांना हाकलून देऊ अशीही धमकी दिली.

सोसायटी चेरमन राकेश शर्मा यांनी सांगितले की सीसीटीव्ही CCTV मध्ये पहाटे घडलेला संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT