Pune Wagholi dumper accident Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Wagholi Accident : भरधाव डंपरची बाईकला धडक, महिलेला चाकाखाली चिरडलं; उपस्थितांच्या अंगावर काटा

Pune Wagholi Dumper Accident : वाघोलीतील बायफ रोडवर दुचाकीला डंपरने जोरदार धडक दिली असून, या भीषण अपघातात दुचाकीवरील महिला डंपरच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाली आहे.

Prashant Patil

पुणे : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली परिसरात पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. येथे पुन्हा एकदा डंपरने रक्तरंजित अपघात घडवला आहे. वाघोलीतील बायपास रोडवर दुचाकीला डंपरने जोरदार धडक दिली असून, या भीषण अपघातात दुचाकीवरील महिला डंपरच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाली आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. डंपर चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. वाघोली परिसरात डंपर अपघातांची मालिका सुरूच आहे, मात्र प्रशासन आणि वाहतूक नियंत्रण यंत्रणा मात्र गप्प का? असा सवाल आता उपस्थित होतोय.

दरम्यान, आज अक्षय तृतीयेनिमित्त पुणे शहरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या भागात PMPL बस आणि दुचाकी वाहनांना बुधवारी (१ मे २०२५) सकाळी ७ ते रात्री १२ या वेळेत प्रवेशबंदी असेल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्गांचे नियोजन केले आहे. पुणे शहराच्या मध्यभागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, गणेश रस्ता आणि लक्ष्मी रस्ता या परिसरात वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. या काळात PMPL बस सेवा पर्यायी मार्गांवरून चालवली जाईल. वाहनचालकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी सुस्पष्ट मार्गदर्शन जारी केले आहे.

असे असतील वाहतुकीत बदल

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौकातून (माॅडर्न कॅफे हाॅटेल) स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, खंडोजीबाबा चौक, टिळक चौकमार्गे पुढे जाणे

स. गो. बर्वे चौकातून महापालिकेकडे जाणाऱ्या वाहनांनी जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक, काँग्रेस भवन या मार्गाने महापालिका भवन येथे जावे

दारुवाला पुलाकडून फडके हौदमार्गे जाणारी पीएमपी बस सेवा पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

पुणे वाहतूक पोलिसांनी नागरिकांना या बदलांचे पालन करण्याचे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मंदिर परिसरात भाविकांची गर्दी लक्षात घेता, वाहनचालकांनी शक्यतो मध्यवर्ती भाग टाळावा, असेही सुचवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा तडाखा, नदी-नाल्यांना पूर; रस्ते वाहतूक ठप्प, शेती पाण्याखाली

Maharashtra Live Update: उल्हासनगरातल्या क्रीडांगणांसाठी 100 किमी धावला तरुण

Kalyan Protest: मासविक्री बंदीविरोधात खाटिक समाज आक्रमक, KDMC समोर कोंबड्या घेऊन आंदोलन; पाहा VIDEO

Janmashtami 2025 : जन्माष्टमीच्या दिवशी घरात या वस्तु ठेवल्यास येऊ शकते नकारात्मकता

Viral Video: कारला उडवलं नंतर पोलिसांना चकवा; भरधाव वेगात कॅब चालकाचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT