Pune Black Magic Viral Video News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : तुमचा पित्ताचा त्रास दूर करतो..., महिलेला खुर्चीवर बसवलं अन् अघोरी पूजा केली; पुण्यातील घटना चर्चेत

Pune Black Magic Viral Video News : पुण्यात एका महिलेचा आजार बरा करण्यासाठी अघोरी व जादूटोण्याचा प्रयोग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अंधश्रद्धा विरोधी कायद्याअंतर्गत चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यात अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार उघड

  • आजार बरा करण्यासाठी अघोरी प्रयोगाचा दावा

  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • अंधश्रद्धा विरोधी कायद्यांतर्गत तक्रार दाखल

  • समाजात संताप व जनजागृतीची मागणी

अक्षय बडवे, पुणे

एका बाजूला शिक्षणाचे माहेर घर अशी ओळख असलेल्या पुण्यात आजही अंधश्रद्धेचे प्रकारदिवसेंदिवस वाढत आहेत. एका महिलेला होणारा पित्ताचा त्रास बरा करण्यासाठी अघोरी प्रयोग केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी ज्योतिषाचार्य म्हणवून घेणाऱ्या संबंधित लोकांच्या विरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील एक व्हिडिओ सोशल मिडिया वरून समोर आला. यामध्ये एका महिलेला खुर्चीवर बसवण्यात आले असून, तिच्याभोवती इतर तिघेजण उभे आहेत. समोर एका फळ्यावर काही वाक्ये लिहिली असून, ती वाचत हे तिघे जणं महिलेभोवती काहीतरी पुटपुटत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

फळ्यावरचे मंत्र वाचून पित्त कमी करण्याचा दावा यामधून करण्यात आला. हा प्रकार जादूटोणा आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. हा व्हिडिओ अंधश्रद्धा विरोधी कायद्याचे उल्लंघन करणारा असून, पोलिसांनी याची तातडीने शहानिशा करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

दरम्यान पित्त किंवा अन्य आजारांवर उपाय करण्यासाठी संबंधित तज्ज्ञांचा तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मात्र अशाप्रकारच्या अंधश्रेद्धेला बळी पडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या पतीला टॉर्चर केलं, ते आत्महत्या करणारच नाहीत; जीएसटी अधिकाऱ्याच्या पत्नीचा दावा

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेची कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा रद्द

उधार घेतलेले 10000 रुपये कधी देणार? रागाच्या भरात सपासप वार, तरुणाचा मृत्यू

प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी सुरू असताना घातपाताचा कट उधळला; 'जैश'च्या दहशतवाद्याला कंठस्नान

Saturday Horoscope: गुंतवणुकीचा होईल फायदा, 4 राशींना होणार आर्थिक लाभ; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT