पुणे विमानतळावर २.२९ कोटी रुपयांचा गांजा जप्त
बँकॉकवरून आलेल्या प्रवाशाकडे सापडला गांजा
एअर इंटेलिजन्स युनिटची बेधडक कारवाई
अकोल्यात कारमधून २.६० लाखांचा गुटखा जप्त
दोन्ही तस्करी प्रकरणांवर पोलिसांचा वेगवान तपास सुरू
अक्षय बडवे, पुणे
पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुणे विमानतळावर २.२९ करोड रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. बँकॉक वरून पुण्यात आलेल्या प्रवाशाची झडती घेताना त्याच्याकडे दोन एअरटाईट पिशव्यांमध्ये अमली पदार्थ सापडले. एअर इंटेलिजन्स युनिटने तातडीने प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या एअर इंटेलिजन्स युनिटला याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, एअर इंटेलिजन्स युनिटने ८ डिसेंबर रोजी कडक पहारा दिला. याचदरम्यान बँकॉक वरून पुण्यात आलेल्या इंडिगो विमान क्रमांक 6E-1096 मधील एका प्रवाशाला चौकशीसाठी थांबवले.
त्याच्या चेक इन बॅग ची तपासणी केली असता, त्यात दोन एअरटाईट पिशव्यांमध्ये गांजा आढळून आला. त्याच्या बॅगेतून २ हजार २९९ ग्रॅम गांजा ज्याची बाजार भावाप्रमाणे २.२९ करोड रुपये किंमत असलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे
अकोला गुन्हेशाखेच्या पथकाने अमरावती अकोला टि पॉईंटलगत एका कारमधून २ लाख ६० हजार रुपयाचा गुटखा जप्त करत एका इसमाला अटक केली. राजू शहा कदिर शहा गुन्हेगाराचे नाव आहे.पोलिसांच पथक अमरावती बडनेरा ते अकोला मार्गावर गस्तीवर असतांना एका कारमधून गुटखा जात असल्याची माहिती मिळाली. पथकाने अकोला टि पॉईट लगतच्या बोथरा नर्सरीजवळ भरधाव येणारी कार थांबवून पाहणी केली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आढळला. पोलिसांनी गुटखा व कार असा एकूण ७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल बडनेरा पोलिसांच्या ताब्यात दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.